कोल्हापूर : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी श्रयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून दरमहा ५०० रुपये दिले जातात. मात्र, केंद्र सरकारकडून वर्षभर अनुदानच येत नसल्याने रक्कम खात्यावर वर्गच करता येत नाही. सरकारी अनास्थेमुळे टीबी रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा मूळचा उद्देशच बाजूला पडला असून स्वत:चे पोषण स्वत:च करत आहेत.
क्षयरोग हा संक्रमक रोग असून क्षयरोगीच्या संपर्कात येण्याने तो वेगाने पसरतो. जंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर फुप्फुसावर मारा करतात. मेंदू व मूत्रपिंडामध्ये देखील हा रोग पसरू शकतो. त्यामुळे साधारण लक्षणे दिसताच वेळीच उपचार घेणे हेच जास्त परिणामकारक ठरते. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी लागण झालेल्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे असते; पण बहुधा गरिबांमध्येच टीबी रुग्णाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांना चांगला आहार मिळेल याची शक्यता नसते. ही गरज ओळखूनच शासनाने निक्षय पोषण आहार योजना सुरू केली आहे. त्यातून रुग्णाचे टीबीचे निदान झाल्यापासून ते उपचार घेऊन बरे होण्यापर्यंत दरमहा प्रति व्यक्ती ५०० रुपये रुपये अनुदान दिले जाते; पण शासनाकडून दर महिन्याला अनुदान येत नसल्याने सहा महिन्यांतून एकदा तीन हजार रुपये असे खात्यावर वर्ग केले जातात; पण ही रक्कम मुळात तोकडी आहे आणि सहा महिने थांबावे लागत असल्याने पोषण आहार कसा घ्यायचा याची विवंचना या रुग्णांना असते. चालू वर्षी तर गेल्या वर्षभरापासून अनुदानच आलेले नाही.
जिल्ह्यातील लाभ घेणारे टीबीचे रुग्ण
२०१८ मध्ये लाभ घेतलेले : १४९०
२०१९ मध्ये लाभ घेतलेले : १७८४
यावर्षी आतापर्यंतचे लाभार्थी : ५८५
२) जिल्ह्यासाठी प्रति लाभार्थी ५०० रुपयांप्रमाणे दरवर्षी ६० लाख रुपये लागतात. गेल्या वर्षी एवढीच रक्कम आली होती, यावर्षीदेखील तेवढी मागणी केली आहे; पण आजअखेर यातील एक रुपयादेखील आलेला नाही.
३) टीबीची लक्षणे काय (बॉक्स)
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा पण संध्याकाळी वाटणारा ताप, थुंकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे.
४) जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त (कोणत्या प्रकारचा टीबी किती दिवसांत बरा होतो याचा बॉक्स)
क्षयरोगाचा पिकार व तीव्रता यावर उपचार ठरवले जातात. साधारपणे हा काळा सहा महिने ते तीन वर्षांचाही असतो. यात लेटेस्ट इन्फेक्शन असल्यास सहा महिन्यांसाठी एकाच प्रकारचे औषध वापरले जाते. सक्रिय पल्मनरी संक्रमण असल्यास सहा ते नऊ महिन्यांपर्यंत संयोजन थेरपी वापरली जाते. एक्स्ट्रा पल्मनरी संक्रमण हा तीव्र स्वरूपाचा असल्याने ६ ते ९ महिन्यांपर्यंत एकापेक्षा जास्त औषधांचा वापर होतो. औषध प्रतिरोधक संक्रमण या प्रकारात उपचार करताना जिवाणू औषधांना प्रतिरोध करणाऱ्या करणाऱ्या थेरपीचा वापर होतो. यासाठी १८ महिने ते ३ वर्षांचा कालावधी लागतो.
५) उपचारार्थ नाेंद झालेल्या सर्वांना निक्षय पोषण आहार मिळावा यासाठी नोंदणीची प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाते. सरकारीसह खासगी दवाखान्यांना देखील अनुदानाची रक्कम दिली जाते; पण अनुदान येण्यास मागे पुढे होत असल्याने ते येईल तसे एकदम दिले जात आहे.
-डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी