कोल्हापूर सध्या कोरोना प्रतिबंधक दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मोठे महत्त्व आले आहे. गेले अनेक दिवस किमान दोन डोस झालेल्या नागरिकांना तरी हवाई, रेल्वे प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी होती. तसेच मॉलमध्येही प्रवेशासाठी दोन डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास देण्याची योजना आखली आहे.
हा पास ऑनलाइन घेण्याची योजना असून या माध्यमातून घरबसल्या हा पास नागरिकांना मिळवता येणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण केलेले या पाससाठी अर्ज करू शकणार आहेत.
१) जिल्ह्यात दोन्ही डोस घेतले किती?
फ्रंट लाइन वर्कर्स - ५६,३२२ १८९ टक्के
आरोग्य कर्मचारी - ३७,३२८ ९८ टक्के
१८ ते ४४ वयोगट -२३,८५३ १ टक्का
४५ ते ६० -३,१०५७७ ४४ टक्के
६१ पेक्षा जास्त वयाचे -३,०१९६३ ५३ टक्के
२) असा मिळवा ई-पास (बॉक्स. हा बॉक्स कोणीही बदलू नये. बॉक्समध्ये इंग्रजी शब्द आहेत.)
- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
-त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एक वेळ वापरासाठीचा पासवर्ड लघु संदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
-त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
-त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
-या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाइल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाइल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघु संदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.