शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
2
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
3
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
4
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
5
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
6
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
7
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
8
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
9
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
10
देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू
11
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
12
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?
13
मविआतील पक्षांना अक्षय शिंदेचा पुळका आलाय; भाजपाचा घणाघात, उद्धव ठाकरेंवरही टीका
14
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
15
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
16
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
17
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
18
पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन, ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
20
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)

(स्टार ११११) मदतीला धावून येणारे कोल्हापूरचे रिक्षाचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याच्या इतर काही जिल्ह्यांत, शहरात रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढल्याचे चित्र असले तरीही ‘कोल्हापूरचे रिक्षाचालक म्हणजे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्याच्या इतर काही जिल्ह्यांत, शहरात रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढल्याचे चित्र असले तरीही ‘कोल्हापूरचे रिक्षाचालक म्हणजे संकटकाळी नेहमीच मदतीला धावून येणारे’, अशीच प्रतिमा आहे. ‘रिक्षात तुमचे काही विसरले तर नाही नां’ अशी आठवण करून देणारा उल्लेख रिक्षातील प्रवाशाच्या नजरेस पडतोच. रात्री-अपरात्री महिला प्रवाशांनाही सुरक्षितस्थळी पोहोचविण्याची विश्वासार्हता कोल्हापूरच्या रिक्षाचालकांत आहे. त्यामुळेच कोल्हापूरच्या रिक्षाचालकांची ‘लई भारी’ अशीच राज्यभर प्रतिमा आहे.

जिल्ह्यात सुमारे १५ हजार २०७ रिक्षा आहेत. त्यापैकी नऊ हजारांवर रिक्षा ह्या कोल्हापूर शहरात फिरतात. दिसायला देखणी, स्वच्छतेच्या बाबतीत टापटीप अशीच रिक्षा फक्त कोल्हापुरातच दिसेल. शहरात दरवर्षी रिक्षा सौंदर्य स्पर्धा घेऊन रिक्षांची सुंदरता, रिक्षा चालवण्यातील कसब टिकवून ठेवले आहे. अनेक चालकांना त्यांच्या रिक्षानंबरवरून ओळख आहे.

कोल्हापुरातील रिक्षाचालक हा गरीब व सर्वसामान्य असला तरी त्याचा प्रामाणिकपणा हा वाखाणण्याजोगा आहे. रिक्षात प्रवाशाचे किमती साहित्य विसरल्यास रिक्षाचालक त्या प्रवाशाचा शोध घेऊन त्याला प्रामाणिकपणे परत करतात. संबंधित प्रवासी न मिळाल्यास साहित्य त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे जमा केले जाते. रिक्षाचालक हा गरीब असला तरीही तो स्वार्थी स्वभावाचा निश्चितच नसल्याचे चित्र अनेक उदाहरणावरून दिसते.

मदतीसाठी नेहमीच पुढाकार

कोरोना असो अगर पूरस्थिती, फटका बसतो तो रिक्षाचालकांनाच. लॉकडाऊनमध्ये रिक्षा व्यवसाय बंद राहिल्याने चालकांची उपासमार होत होती. पण रिक्षाचालकांच्या मदतीसाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी, पोलिसांसह समाजातील अनेक दातृत्व पुढे आले. काही रिक्षाचालकांनीच एकमेकाला मदतीचा हात देऊन संकटातून सावरले.

पोलिसांची कौतुकाची थाप

गेल्या अनेक वर्षांत सचोटीने व्यवसाय करत रिक्षाचालकांनी आपला प्रामाणिकपणा जपला आहे. रिक्षात विसरलेल्या कितीतरी मौलवान वस्तू त्यांनी प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना परत केल्या आहेत. अशा प्रामाणिक रिक्षाचालकांचा कोल्हापूर पोलीस दलामार्फत नेहमीच सत्कार होतो.

रिक्षा संख्या

जिल्ह्यात : १५,२०७

कोल्हापूर शहर : ९१००

प्रामाणिक रिक्षाचालकांचा पोलीस ठाण्यात सत्कार

वर्षे : प्रामाणिक रिक्षाचालक

१) २०१९ : ३१

२) २०२० : १६

३) २०२१ (जुलैअखेर) : ०७

अपवाद रिक्षाचालकांची डोकेदुखी

शहरात काही अपवादात्मक रिक्षाचालक प्रवासीभाडे आकारताना प्रवाशांची लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्रीच्या वेळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षात बसल्यानंतर प्रवासी उतरताना भाडे देण्यावरून वादावादीचे प्रसंग घडतात. अशा लुबाडणूक करणाऱ्या रिक्षाचालकांना पोलिसांनी यापूर्वीची ‘खाक्या’ दाखवला. हे कृत्य विनापरवाना रिक्षाचालकांकडून होत असल्याचे दिसते. छेडछाड, लूटमार, चोरी असे प्रकार मात्र चालकांकडून घडलेले उदाहरणही नाहीत.

कोट..

कोल्हापूरच्या रिक्षाचालकांकडून लूटमारसारखे प्रकार कधी घडले नाहीत. रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी छेडछाड अगर लुबाडणूकचा प्रकार होत असेल तर त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यानुसार दंड करता येते. प्रसंगी रिक्षा परमीटही रद्द केले जाते. - दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर.

कोट...

रिक्षाचालकांकडून गैरप्रकार कधी दिसून आला नाही. विश्वासार्हता जपणारा असा आहे. नियम तोडणाऱ्याला मात्र दंडाला सामोरे जावे लागते. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कोल्हापूर शहर