शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

स्टार ८४१...‘मृगा’चा तडाका, ‘आद्रर्का’ची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:17 AM

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘मृग’ नक्षत्राने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. चार-दिवस झालेल्या जोरदार पावसाचा ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘मृग’ नक्षत्राने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. चार-दिवस झालेल्या जोरदार पावसाचा तडाका बसल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. आता ‘आद्रर्का’ नक्षत्रात पावसाचे काहीसी उसंत घेतली असली तरी त्याची धास्ती मात्र कायम आहे. जूनमध्ये सरासरी ३४८ मिलिमीटर पाऊस पडल्याने खरीप पिकांची पुरती दाणादाण उडवून दिली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचे ओढ दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती काहीसी वेगळी आहे. माॅन्सून सक्रिय झाला आणि त्याचा जोर वाढत गेला. ‘मृग’ नक्षत्राच्या शेवटच्या टप्यात सलग तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गेल्या दहा वर्षांत पहिल्यादांच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नद्यांना पूर आला. जिल्ह्यात खरिपाची ५५ टक्के पेरणी झाली आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताची उगवण झाली. मात्र जोरदार पावसाने अनेक ठिकाणी भात पीक कुजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भुईमूग, सोयाबीनचेही काही ठिकाणी नुकसान झाले आहे. खरा पाऊस लागणारी नक्षत्रे अजून लागायची आहेत. एरव्ही कोरडे जाणारे ‘मृग’ नक्षत्र जोरदार लागल्याने पुढील नक्षत्राचा काय नूर राहील. याविषयी सगळ्यांच्या मनात धास्ती आहे.

जून महिन्यातील पावसाची सरासरी - १४० मिलिमीटर

आतापर्यंत झालेला पाऊस - ३४८ मिलिमीटर

सर्वात कमी पाऊस - २१३ मिलिमीटर, शिरोळ तालुका

सर्वात जास्त पाऊस - ८१९ मिलिमीटर, गगनबावडा तालुका

तालुकानिहाय झालेली पेरणी हेक्टरमध्ये

तालुका पेरणी

हातकणंगले ५२००

शिरोळ १२५०

पन्हाळा २८००

शाहुवाडी ५५०

राधानगरी ७६००

गगनबावडा ११५०

करवीर ८७६०

कागल ७९००

गडहिंग्लज ११६००

भुदरगड १२०५०

आजरा ६३००

चंदगड १३०२५

तालुकानिहाय पेरणी आणि झालेला पाऊस

तालुका पाऊस मिलिमीटर

हातकणंगले २१६

शिरोळ २१३

पन्हाळा ३११

शाहुवाडी ४२७

राधानगरी ४१८

गगनबावडा ८१९

करवीर २७७

कागल ३४०

गडहिंग्लज ३६५

भुदरगड ३४४

आजरा ४१८

चंदगड ४९४

सरासरीच्या २० टक्के पाऊस जूनमध्येच

जिल्ह्याची माॅन्सूनमधील सरासरी १७१४ मिलिमीटर आहे. जूनच्या चार-पाच दिवसांतच त्यातील २० टक्के म्हणजेच ३४८ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस सरासरीच्या ५१ टक्के शिरोळमध्ये तर ४० टक्के हातकणंगले तालुक्यात झाला आहे.

कोट-

मृग नक्षत्रात एवढा पाऊस कधीच होत नाही. मात्र चार-पाच दिवस झालेल्या जोरदार पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान केले. आठ-नऊ महिने वाढवलेले ऊस आडवे झाले आहेत.

- बळवंत पाटील (शेतकरी, शिरगाव)

फोटो ओळी : मागील आठवड्यात कोल्हापुरात झालेल्या जोरदार पावसाने ऊस पिकात पाणी उभा राहिले. (फोटो-२३०६२०२१-कोल-ऊस) (छाया- नसीर अत्तार)