शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहीम जनजागृतीला प्रारंभ : विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:32 AM

कोल्हापूर : वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे फलक घेऊन वाहनधारकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.या मोहिमेत वाहतूक पोलिसांसह ...

कोल्हापूर : वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे फलक घेऊन वाहनधारकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

या मोहिमेत वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेतला. ‘शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू’, असे आवाहन वाहनधारकांना केले.वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळावी. प्रथम रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्यावा. नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस, स्वयंसेवी संस्थांकडून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत युनिक आॅटोमोबाईल, नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे, कोडोली येथील गनिमी कावा ग्रुपचे तरुण आणि पोलिसांनी सहभाग घेतला.

यावेळी पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले, ‘वाहतुकीच्या शिस्तीसाठी पोलिसांकडून नियमित प्रयत्न सुरू असतात. मात्र, वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने नियमांचे पालन होत नाही. आपल्याला वाहतुकीची शिस्त हवी असेल, तर नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्यामुळे कोणाची अडवणूक होऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घेतली तर, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. पोलिसांसह काही स्वयंसेवी संस्थादेखील यासाठी रस्त्यावर उतरत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. महापौर स्वाती यवलुजे यांनी प्रबोधन मोहिमेचे स्वागत करून शहरातील मार्गदर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीडब्रेकर, ट्रॅफिक सिग्नल सुसज्ज ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्न करील, असे आश्वासन दिले.

झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नये, सीट बेल्टचा वापर करावा, रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवावी, रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास जागा द्यावी, ट्रिपलसीट प्रवास करू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे असे सांगत, ‘शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू,’ असे आवाहन केले. यानिमित्त पोलीस व्हॅनमधून वाहतूक नियमांची चित्रफीतही दाखविण्यात आली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, नगरसेवक संजय मोहिते, युनिक आॅटोमोबाईलचे सुधर्म वाझे, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, प्रा. किरण पाटील, बिपीन मिरजकर, अभय देशपांडे, राहुल देसाई, ‘गनिमी कावा ग्रुप’चे संतोष हुजरे, अशोक पाटील, अमोल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे हे ‘केवायफोरएस’ या संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (दि. १७) पासून वाहतुकीच्या नियमांची माहिती वाहनधारकांपर्यंत पथनाट्याद्वारे पोहोचविणार आहेत. शहरातील विविध चौकांत पथनाट्ये सादर करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, याकरिता प्रबोधन केले जाणार आहे. विशेष म्हणजे यात अंध विद्यार्थीही सहभाग घेणार आहेत.कोल्हापुरातील कावळा नाका येथे विविध स्वयंसेवी संस्था व युनिक आॅटोमोबाईलच्या वतीने ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ ही मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन महापौर स्वाती यवलुजे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी तिरूपती काकडे, सुधर्म वाझे, संजय मोहिते, आदी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर