कोल्हापूर : येथील निसर्ग मित्र संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षानिमित्त गुरुवार, दिनांक २४ जून रोजी वटपौर्णिमेचा दिवस महाराष्ट्र वृक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संस्थेमार्फत विविध वनौषधी वृक्ष दत्तक योजनेला प्रारंभ करण्यात येणार आहे.
पावसाळा सुरू झाला की सर्वांना झाडे लावायला आवडते, सध्या जागतिक तापमान वाढ व विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या सोडवायच्या असतील तर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही, पण वृक्षारोपण करताना किमान तीन ते पाच फुटांचा वृक्ष असणे गरजेचे असते. म्हणूनच निसर्गमित्र संस्थेमार्फत २००७ या वर्षापासून वृक्ष दत्तक योजना राबवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीसुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे वनौषधी वृक्ष दत्तक योजनेला प्रारंभ करण्यात येणार आहे.
ही रोपे देणगी ठेव शुल्कामध्ये संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांच्याकडे २८२३ / ४८ बी वॉर्ड, महालक्ष्मी नगर, हॉकी स्टेडियम रोड, कोल्हापूर याठिकाणी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत उपलब्ध होणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून रोपे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहेत.
लोकसहभागातून २००० रोपांची निर्मिती
वनौषधी वृक्ष दत्तक योजनेमध्ये वड, आवळा, बेहडा, कडुलिंब, अश्वगंधा, दालचिनी, तमालपत्रे, हादगा, गोकर्ण, गुळवेल, कोहळा, मायाळू, चिबूड, वेखंड, सब्जा, मिंट, बेल, शेंद्री, बहावा, जांभूळ, फॅशन फ्रुट, कवट, शेवगा, टेंभुर्णी, मोह, शमी, पेरू, कोकम, फणस, लिंबू, रताळे, अंजीर, अडुळसा, कडीपत्ता, इत्यादी वृक्ष, वेली, झुडपे आणि फळझाडे अशा दोन हजार रोपांची निर्मिती लोकसहभागातून केली आहे. यानिमित्ताने काही वनस्पतींच्या बियांचेही वाटप करण्यात येणार आहे.
---------------------------------------------------------------
फोटो आहे : 21062021-kol-nisrg mitr ropwatika.jpg
(संदीप आडनाईक)
===Photopath===
210621\21kol_1_21062021_5.jpg
===Caption===
फोटो आहे : 21062021-kol-nisrg mitr ropwatika.jpg