शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

रिक्षाचालकांकरीता कल्याणकारी महामंडळ त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 4:24 PM

तीन आसनी रिक्षाकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली.

ठळक मुद्देरिक्षाचालकांकरीता कल्याणकारी महामंडळ त्वरित सुरू कराकॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेची आरटीओकडे मागणी

कोल्हापूर : गेली चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रामध्ये तीन आसनी रिक्षा या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक प्रमुख घटक बनल्या आहेत. त्यांच्याकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली.राज्यातील लाखो रिक्षा प्रवासी यांना अहोरात्र सेवा देत आहेत. परंतु हा घटक नेहमी शासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. रिक्षा टॅक्सी क्रांती संघर्ष कृती समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने राज्यभरातील तीन आसनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात म्हणून रविवार(दि. ९)पासून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कॉमन मॅनने या आंदोलनास पाठिंबा म्हणून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे यांना निवेदन दिले.घोषित केलेल्या रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी. आत्महत्याग्रस्त रिक्षाचालकांच्या वारसांना तत्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या. रिक्षाचालकांना कोविड योद्धा म्हणून ५० लाखांचे विमा कवच द्या. शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकांचे सरसकट कर्ज माफ करावेरिक्षाचालकांना दिल्ली, कर्नाटक, व आंध्र सरकारच्या धर्तीवर दरमहा पाच हजार रुपये तातडीची मदत द्या या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.यावेळी कॉमन मॅनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बाबा इंदुलकर, जिल्हाध्यक्ष-अविनाश दिंडे, उपाध्यक्ष जाफर मुजावर, सचिव श्रीकांत पाटील, संजय भोळे, खजानिस नरेंद्र पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर