यावेळी जुलै २०१९ ला तलावाची भिंत कोसळल्यानंतर तलावाचे काम ठप्प आहे. या कामाचे नवीन अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी घेण्याचे काम गेली दीड वर्षे प्रलंबित आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना याप्रश्नी लक्ष घालून लवकर काम सुरू करण्याच्या सूचना केल्या, तसेच अतिरिक्त कामे असतील तर रोजगार हमी योजनेतून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. यावेळी अशोक धोंगे यांनी सर्व बाबींचा आढावा एक आठवड्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी करवीरचे माजी उपअभियंता डोंगळे, शाखा अभियंता मुरलीधर भोसले, जि. प. पाणीपुरवठा विभागाचे अंकुश पवार, ग्रामपंचायत सदस्य उत्तम साखळकर, माणिक जाधव, सूरज पाटील, दीपक व्हरगे, भगवान पोतदार उपस्थित होते.
फोटो ओळी - वडणगे (ता. करवीर) येथील प्रलंबित तलावाच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा करताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अशोक धोंगे, सरपंच सचिन चौगले.