ज्योतीप्रसाद सावंत -आजरा --साखर कारखाना निवडणूक होऊन पहिला गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच सत्तारूढ आघाडी व विरोधकांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली असून, यामुळे सभासदांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारखान्याचे कारभारीच अशा पद्धतीने वागू लागले तर कारखन्याचे भवितव्य काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आजरा साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. महाआघाडीने काठावरचे बहुमत मिळवित सत्तेची सूत्रे स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले.अध्यक्ष निवडीपासूनच सध्याचे सत्तारूढ व विरोधक यांच्यात अंतर्गत वाद सुरू झाले. साखर वाटप करण्यास सरुवात करून महाआघाडीने आचारसंहितेचा भंग केल्याचा बॉम्ब विरोधकांनी टाकला. पाठोपाठ निवडणूक प्रक्रियेचा निकाल सदोष असल्याचे सांगता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तज्ज्ञ संचालक नियुक्तीवेळी या सभेकडेच विरोधी दहा संचालकांनी पाठ फिरवित आपला रोष कायम असल्याचे दाखवून दिले. हीच संधी सत्ताधाऱ्यांना सापडल्याने सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना राजकारणाचे जोडे आता बाजूला ठेवा, असे सांगत निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रकारात सभासदावर मात्र आता डोक्यावर होत मारून घेण्याची वेळ आली आहे. मुळातच यावर्षी ऊस क्षेत्रात घट झाली आहे.राजकीय साठमारी अशीच चालू राहिल्यास कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजारील कारखान्यांसमोर ऊस टंचाईचा प्रश्न असल्याने उसाची पळवापळव होणार हेसुद्धा स्पष्ट आहे. आजरा साखर कारखान्यात डिस्टीलरी, सहवीज प्रकल्प सुरू करण्याशिवाय पर्यायही नाही सभासदांनी लोकशाही पद्धतीने सर्वच संचालकांना विश्वास म्हणून पाठविले आहे. अशावेळी संचालक मंडळातील अंतर्गत वाद आता तरी परवडणारे नाहीत हे नक्की.राजकारणामुळे नुकसानराजकीय साठमारी अशीच चालू राहिल्यास केवळ राजकारणामुळे काही ऊस बाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेजारील कारखान्यांसमोर ऊस टंचाईचा प्रश्न असल्याने उसाची पळवापळव होणार हेसुद्धा स्पष्ट आहे.आजरा साखर कारखान्यात डिस्टिलरी, सहवीज प्रकल्प सुरू करण्याशिवाय पर्यायही नाही. सभासदांनी लोकशाही पद्धतीने सर्वच संचालकांना विश्वास म्हणून पाठविले आहे. अशावेळी संचालक मंडळातील अंतर्गत वाद आता तरी परवडणारे नाहीत हे नक्की.
आजरा साखर कारखान्याच्या हंगामाआधी राजकीय गुऱ्हाळ
By admin | Published: July 28, 2016 12:18 AM