शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

राज्य सरकारकडून पानसरेंच्या हत्येचा तपास दाबण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:27 PM

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली.

ठळक मुद्देकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली पानसरे कुटूंबियांची भेटपानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शासनाकडून अपेक्षा वैचारीक सेन्सारशिप लावली आहे काय : चव्हाण यांचा आरोप

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली. आजपर्यंत या घटनेच्या तपासामध्ये प्रगती झालेली नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. तपास कुठल्या बाजूने आहे, हे देखील स्पष्ट होत नाही. राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारची भावना आमच्यासह लोकांच्या मनात होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी पानसरे कुटूंबियांची सागरमाळ येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी उमा पानसरे, मेघा पानसरे यांच्याशी चर्चा करुन तपासासंबधी भावना जाणून घेतल्या.

यावेळी ते म्हणाले, पानसरे हत्येच्या तपासामध्ये अद्यापही प्रगती झालेली नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. महाराष्ट्रातील विचारवंताची अशा प्रकारे निघृण हत्या होते. सरकारकडून जी अपेक्षा होती, त्याची आम्ही वाट पाहिली. गेल्या दोन वर्षात काहीतरी निष्पन्न होईल अशी अपेक्षा होती. दूर्देवाने या विषयामध्ये कसलीच प्रगती नाही.

तपास यंत्रणेविषयी लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पानसरे हत्या प्रकरण कुठेतरी निर्णायक स्वरुपाला आले पाहिजे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शासनाकडून अपेक्षा होती. शासन त्यावर काहीच बोलत नाही. मुख्यमंत्री, मंत्री यांचा या विषयाकडे पाहण्याचा दूष्ठीकोण वेगळाच आहे. त्यांच्याकडून गांर्भीयाने हा विषय घेतला जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.तपास यंत्रणेमध्ये वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सुरु असेल तर तपास अधिकारी एकच राहिला पाहिजे. त्यांची बदली होवू नये, चौकशी निर्णायक अवस्थेमध्ये आली पाहिजे. साडेतीन वर्ष झाली, तपास कुठल्या बाजूने आहे हे स्पष्ट होत नाही. राज्य सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, अशा प्रकारची भावना होत आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर हा विषय विधानसभा व लोकसभेमध्ये विविध मार्गानी उचलून घरुन सरकारला जाब विचारु. महाराष्ट्राच्या  इतिहासामध्ये काळीमा फासणारी ही घटना घडली असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार सतेज पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.वैचारीक सेन्सारशिप लावली आहे कायराज्यातील सर्व पक्षांमध्ये पानसरे विचारवंताची ही अवस्था होत असेल तर राज्यातील इतरांना बोलण्याची संधी कोणालाच नाही. वैचारीक सेन्सारशिप लावली आहे काय, राज्यात, देशामध्ये असे गंभीर वातावरण अनुभवास मिळत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कर्तव्याचा भाग समजतो. या दू:खत घटनेमध्ये पानसरे यांच्या कुटूंबियांची भेट घ्यावी, त्यांच्या काय भावना आहेत, त्या समजून घेण्यासाठी मी भेट घेतल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAshok Chavanअशोक चव्हाण