गडहिंग्लज : कोल्हापूर राज इव्हेंटतर्फे येथील मुलींचे हायस्कूल लगतच्या मैदानावर ६ ते ९ फेब्रुवारीअखेर राज्यस्तरीय संजीवनी कृषी प्रदर्शन आयोजित झाले आहे, अशी माहिती राज इव्हेंटचे राज डावरे यांनी दिली.डावरे म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी प्रदर्शनात शेतीसंबंधी विविध स्टॉल्स् व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतीमालाची (ऊस, केळी, फळे व फुले) पीक स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.प्रदर्शनात ट्रॅक्टर शेतीसाठी लागणारी अवजारे, बि-बियाणे, खते व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पद्धती, टिश्चू कल्चर, कृषी व्यवस्थापन, शेती अर्थपुरवठा, बँकिंग इन्शुरन्स, मार्केटिंग व्यवस्थापन, रोपवाटिका, पाणी व्यवस्थापन, शासकीय व खासगी संस्था संघटना आणि शासकीय एजन्सीज्, दुग्ध व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा, मत्सोत्पादन, रेशीम उद्योग, अन्न प्रक्रिया व साठवणूक, पॅकेजिंग पद्धती आदी विषयासंबंधी स्टॉल्स् मांडण्यात येणार आहेत.राज्य शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद, गडहिंग्लज तालुका कृषी विभाग व कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडील तज्ज्ञमंडळी प्रदर्शनात मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डावरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
शुक्रवारपासून राज्यस्तरीय संजीवनी कृषी प्रदर्शन
By admin | Published: February 01, 2015 11:50 PM