शेती आणि शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; परंतु केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदे बनवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नवे तीनही कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, कुटुंबास १ कोटी रुपये मदत द्यावी, आंदोलन बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा वंचित आघाडीतर्फे सुरू केलेले व्यापक आंदोलन थांबणार नाही.
शिष्टमंडळात अर्जुन दुंडगेकर, आप्पासाहेब भडगांवकर, महादेव खातेदार, विजय शिरगांवकर, ज्ञानराजा चिघळीकर, परशुराम कांबळे, शिवाजी कांबळे, बसप्रभू कांबळे आदींचा समावेश होता.
-----------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन देताना परशुराम कांबळे, अर्जुन दुंडगेकर, बसप्रभू कांबळे, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०५०३२०२१-गड-०४