निवेदनात म्हटले आहे की, सदर शाळेच्या दुरवस्थेचे व्हिडिओ फुटेज घेतले असून, शाळेची स्टाफ रूम, विद्यार्थी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळेची पडझड याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
शाळेत कोणी शिक्षक येत नाही असे दिसून आले आहे. संबंधित शिक्षक व अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व अधिकाऱ्यांनी शाळेच्या दुरवस्थेबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. निवेदनावर जी. एस. कांबळे व चिले यांच्या सह्या आहेत.
फोटो = कावळटेक, ता. गगनबावडा येथील शाळेची झालेली दुरवस्था.