येथील शिवराज्य मंच, वनमित्र संस्था, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जमले. तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित नसल्याने कागल पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना हे निवेदन दिले. तिरंगा ध्वज आणि काळे ध्वज घेऊन मुख्य मार्गावरून निषेध फेरीही काढण्यात आली. इंद्रजित घाटगे, अशोक शिरोळे, सागर कोंडेकर, सचिन घोरपडे यांची भाषणे झाली. यावेळी तानाजी बाबर, आनंदा हवालदार, रोहित जाधव, प्रवीण जाधव, राजेंद्र बागल, कृष्णात शेंडे, अनंत चौगले हे प्रमुख कार्यकर्ते सोशल डिस्टन्स ठेवीत या निदर्शनात सहभागी झाले.
फोटो.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्याकडे बुधवारी देण्यात आले.