यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, यशवंतदादा यांनी आपल्या रांगडे स्वभावाने सामान्य माणसाशी एकरूप होऊन मतदारसंघात पायाभूत विकासकामे केली.
यावेळी गोकूळचे संचालक अरुण नरके, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, डॉ. जयंत पाटील, डॉ. अभिजित इंगवले यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला
यावेळी पुतळा शिल्पकार व सुशोभिकरण करणाऱ्या सर्वांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करणेत आला. यावेळी यशवंत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पद्मजा पाटील, कोडोलीचे सरपंच मनीषा पाटील, डॉ अभिजित इंगवले, कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, धीरज पाटील, विनीता पाटील , संंस्थचे उपाध्यक्ष निवृत्ती काईगंडे शिवाजी निबाळकर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी शाहू कुकुटपालन संस्थेचे सर्व संचालक सभासद व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक स्वागत व संस्थेच्या कार्याचा आढावा अध्यक्ष लक्ष्मणराव कुलकर्णी यांनी घेतला आभार जि. प.चे माजी सभापती अमरसिंह पाटील यानी मानले. सूत्रसंचालन सचिन फल्ले व आर. आर. पाटील यांनी केले.
टीप आजच्या अंकात जाहिरात होती तरी फोटोसह सविस्तर बातमी घेणे विषयी विनंती
फोटो
ओळ : शहापूर, ता. पन्हाळा येथे माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करताना गृहराज्यमंत्री सतेज पाटीलसोबत अरुण नरके, बजरंग पाटील, अमर यशवंत पाटील , डॉ. जयंत पाटील, पी. आर. पाटील , लक्ष्मण कुलकर्णी व इतर मान्यवर.