शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कलाकारांच्या पाठीशी राहू : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 5:56 PM

कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २८ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पासूनची परंपरा व कलाकारांना प्रोत्साहन देत आलो आहोत. कलाकारांच्या पाठीशी रहात आलो आहोत, यापुढेही राहू, असे आश्वासन खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. या संस्थेसाठी कोणत्याही प्रकारची शासनस्तरावरची मदत देण्याची ग्वाही या निमित्ताने त्यांनी दिली.

येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील आजी माजी ए. टी. डी. (कलाशिक्षण प्रशिक्षण) विभागाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. या प्रदर्शनामध्ये ए.टी.डी. (कलाशिक्षण प्रशिक्षण) विभागाच्या विद्यार्थ्यांच्या १०० कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये रचनाचित्रे, निसर्गचित्रे, वस्तूचित्रे, शिल्पकला, हस्तकला, क्राफ्टवर्क, मास्क इत्यादी विविधप्रकारच्या कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत. हे प्रदर्शन दि. ३ जून २०१६ पर्यंत खुले राहणार आहे.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे, प्राचार्य सुरेश पोतदार, विश्वस्त विजयमाला मेस्त्री, विश्वस्त उज्वल दिवाण, संचालक अमृत पाटील, शैलेश राऊत, विजय टिपुगडे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. मनिपद्म हर्षवर्धन यांनी केले, प्रास्तविक वैशाली पाटील यांनी केले. यावेळी संस्थेविषयी माहिती प्रा. मनोज दरेकर यांनी दिली. माजी विद्यार्थी चेतन पाटील याने मनोगत व्यक्त केले तर प्रा. सुनील पोवार यांनी आभार मानले. यावेळी सुनील पोवार, शैलेश राउत, संतोष सणगर, संदीप पोपेरे, राहुल सुतार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी तसेच पालक, कलारसिक उपस्थित होते.