कोल्हापूर : कर्जमाफीवर टीका करणाºया सुकाणू समितीमधील काही सदस्यांची इतर राज्यांत सत्ता आहे, त्यांनी तिथे कर्जमाफी द्यावी आणि मग येथे येऊन शहाणपण शिकवावे, असा इशारा देत सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती असल्याची टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.खोत म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतचा ‘शब्द’ पाळला आहे. एकराची अट नाहीच. सरसकट दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे, पण सुकाणू समितीला ते मान्य नसल्याची चर्चा आहे. डोळ्यांवर काळा चष्मा घातलेल्यांना उजेड कसा दिसणार?ज्या कारखान्यांनी अंतिम ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे अंतिम बिलाचा प्रस्ताव त्यांना सादर करावाच लागेल.ऊसदर कोणी मागतो म्हणून नव्हे, तर साखरेच्या बाजारातील भावावर मिळतो. मी म्हणेल तेवढा दर द्यायचा म्हटला तर कारखान्यांचे काय होईल, हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोलाही त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना अप्रत्यक्षपणे लगावला.
‘सुकाणू’ नव्हे सुकलेली समिती - सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:01 AM