शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सावत्र नातवाने केला आजीचा खून

By admin | Published: May 30, 2014 1:38 AM

जीपसाठी कृत्य : मोसमधील खून महिन्यानंतर उघडकीस

मलकापूर : मोसम (ता. शाहूवाडी) पैकी पाटीलवाडी येथे आजीने जीप गाडी घेण्यास नकार दिल्याने सावत्र नातवाने आजीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सावत्र नातू आकाश यशवंत कांबळे (वय २२) यास शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५) यांच्याकडे सावत्र नातू वारंवार जीप घेण्यासाठी पैशांची मागणी करत होता. २६ एप्रिल २०१४ रोजी आजी सकाळी मांजरे-करंजफेण रस्त्यावरील मोसम गावच्या हद्दीतील महादेव श्रीपती मोहिते यांच्या शेताजवळ भांगलण करण्यास गेली होती. सावत्र नातू आकाश तेथे गेला. आजीस बोलावून घेतले. जीप खरेदीसाठी पैसे का देत नाहीस? तुला दाखवतोच म्हणून त्याने लाकडाने डोक्यात वार केला. त्या तेथेच बेशुद्ध अवस्थेत पडल्या. संशय येऊ नये म्हणून त्यांचे डोके रस्त्याच्या गटारीच्या बाजूस व पाय रस्त्याकडे करून तेथून आकाशने पोबारा केला. त्या आजीस परिसरातील लोकांनी ओळखून मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अखेर त्यांचा दि. २८ एप्रिलला हा मृत्यू अपघाती झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली होती. सखुबाईचा मृत्यू अपघाती नसून घातपात झाल्याची तक्रार त्यांच्या भावाने दिल्यानुसार शाहूवाडी पोलिसांनी त्या दिशाने तपास सुरू केला. एक महिन्यानंतर त्यांचा अपघात नसून सावत्र नातवाने जीप घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने खून केल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले. तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, फौजदार एम. एस. नाळे, सहायक फौजदार मनोहर कोळी, आत्माराम सांगले, पो. कॉ. एकनाथ कळंत्रे करीत आहेत. (प्रतिनिधी)