कोल्हापूर : जन्मलेला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सरकारला टॅक्स देत असतो. टॅक्समधून मिळणाऱ्या पैशातून केंद्र, राज्य सरकार विविध विकास कामांच्या योजना राबवत असते. पण, आपण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे टॅक्स भरतो, हेच अनेकांना माहीत नसल्याचे दिसून आले. तरीही टॅक्स भरणारा पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू ? असे प्रश्न विचारत असतो.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर केंद्र, राज्य सरकारचा जीएसटी आकारला जातो. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, सुविधांवर हा कर लावला जातो. यामुळे एकाही व्यक्तीची टॅक्समधून सुटका होत नाही. प्रत्यक्षपणे कर आकारणी केलेल्याची माहिती मिळते. पण, अप्रत्यक्षपणे म्हणजे विविध वस्तूची खरेदी, सेवा, सुविधांवरील टॅक्स घेतल्याचे अनेक जणांना समजत नाही.
१) आपण टॅक्स भरता का?
सचिन बिरंजे, कामगार : मी थेट टॅक्स भरत नाही.
राजू जाधव, ऑटो चालक : रिक्षा व्यवसाय करताना पर्यावरण, रोड टॅक्स भरावा लागतो.
सदानंद झुरे, भाजीपाला विक्रेता : टॅक्स भरण्याइतके माझे उत्पन्न नाही.
महंमद शरीफ शेख, फेरीवाला : होलसेलरकडून फळे व इतर वस्तू खरेदी करताना जीएसटीची रक्कम टॅक्स म्हणून घेतली जाते. पण ती कळत नाही.
अरविंद गवळी, सिक्युरिटी गार्ड : पगारातून दर महिन्याला प्रोफेशनल टॅक्स कपात केला जातो. पण तो थेटपणे घेतला जात नसल्याने कळत नाही.
अशोक कांबळे, साफ सफाई कामगार : कसला टॅक्स मला माहिती नाही. मी भरत नाही.
राजेंद्र शिंदे, सलून चालक : सलूनसाठी लागणारे साहित्य खरेदीवेळी जीएसटी भरावा लागतो.
महेश परीट, लॉन्ड्री चालक : मी टॅक्स भरत नाही.
शांता पोवार, घरकाम करणाऱ्या महिला : रोज राबले तरच पोट भरते मग, टॅक्स कसला भरायचा ?
२) कोट
टॅक्स ही सक्तीने वसूल करण्याची प्रणाली आहे. यातून मिळालेल्या पैशातून राज्य व्यवस्था आणि विकास कामे केली जातात. म्हणूनच प्रत्येकाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून टॅक्स भरावाच लागतो.
डॉ. जे. एफ. पाटील, अर्थतज्ज्ञ