माधुरी पाटील यांचा सन्मान
कोल्हापूर : येथील प्रा. डॉ. माधुरी पाटील यांना डेहराडूनमधील असोसिएशन ऑफ फ्लँट सायन्स रिसर्च प्लाँटिका फाउंडेशनतर्फे यंग प्लँट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी येथील श्रीपंचम खेमराज महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषेदत त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. पाटील या बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांना श्री. अक्कामहादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी कदम, प्रा. बी. एन. कदम आदींचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (१४०९२०२१-कोल-माधुरी पाटील (पुरस्कार)
अमृता कारंडे हिचा सत्कार
कोल्हापूर : ॲडॉबी कंपनीचे ४१ लाखांचे पॅकेज मिळाल्याबद्दल अमृता कारंडे हिचा प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. या हायस्कूलची अमृता ही माजी विद्यार्थिनी आहे. या कार्यक्रमात एनएनएमएस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी आसमंता खोपाळे हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वत्सला पाटील, मुख्याध्यापिका शैलजा भोसले, सुलोचना कोळी, रूचिरा रूईकर, सीमा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.