कोल्हापूर : शहरातील विद्यार्थी वाहतूक व्यवस्था यांची भिस्त रिक्षावर आहे. अनेक वर्षांपासून रिक्षाची नियोजनपूर्व व्यवस्था व शिस्त यांमुळे पालक निश्ंिचत आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक रिक्षावरील कारवाई थांबवावी, या मागणीचे निवेदन जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे, शहरामध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन आदेशाप्रमाणे विद्यार्थी वाहतूक रिक्षा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
यामुळे रिक्षा व्यावसायिकांसोबत विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत. या संदर्भात शासनाला योग्य अहवाल पाठवून सद्य:स्थितीची माहिती द्यावी. विद्यार्थी वाहतूक रिक्षांवरील कारवाई शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, दीनमहंमद शेख, पुष्पराज पाटील, पोपट रेडेकर, जुनेद खान, भारत चव्हाण, शाम आवळे, किशोर कांबळे, संदीप वळकुंजे, रफिक हलिमा, युवराज हुदळीकर उपस्थित होते.