कोल्हापूर : केंद्र सरकारकडून सरकारी उपक्रमातील सार्वजनिक उद्योगातील स्वत:चे भांडवल विकून खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे.त्यामुळे सरकारने सरकारी उपक्रमातील निर्गुंतवणूक थांबावावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्याचबरोबर कामगारांना समान काम-समान वेतनही मिळावे, अशी मागणीही करण्यात आली.
संपूणर्् देशभर खासगी क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात, सरकारी व निम सरकारी खात्यात, बॅँका, आयुर्विमा, संरक्षण उद्योग, केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये रोजंदारीवरील कामगार, तसेच तात्पुरते कामगार घेतले जातात. परंतु या सर्वांना त्याच उद्योगातील कामगारांना मिळणारे वेतन मिळत नाही. त्यांना कायम कामगारांच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
तसेच त्यांना कोणतेही संरक्षणही नाही. त्यामुळे अशा लाखो कामगारांची विविध प्रकरणी पिळवणूक होत आहे. वस्तुत: विविध कायद्यामध्ये तसेच सर्वाेच्च न्यायालयानेही समान काम-समान वेतन असे निर्देश दिलेले आहेत. हे निर्देश पाळले जात नाहीत. असे या निवेदनात म्हंटले आहे.
शिष्टमंडळात प्रदेश सचिव अॅड. अनुजा धरणगावकर, जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील, जयंतराव देशपांडे, अभिजीत केकरे, अमृत लोहार, श्रीकांत पाटील, प्रमोद जोशी, कृष्णात देसाई, विनायक जोशी, रविंद्र एडके, दस्तगीर गोलंदाज, मारुती संकपाळ, राजाराम पाटील, अनिता लोखंडे, रमेश थोरात आदींचा समावेश होता.