शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

CoronaVirus : बँका व फायनान्स कंपन्यांकडून केली जाणारी सक्तीची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 4:57 PM

कोरोनामुळे गेले अडीच महिने सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प असताना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करीत आहेत. तरी ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

ठळक मुद्दे बँका व फायनान्स कंपन्यांकडून केली जाणारी सक्तीची वसुली थांबवावीशिवसेनेचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : कोरोनामुळे गेले अडीच महिने सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प असताना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करीत आहेत. तरी ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, गेले तीन महिने लॉकडाऊनमुळे देशातील व राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने व्यावसायिक, शेती व शैक्षणिक कर्ज घेणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत, शेड्युल्ड, सहकारी बँका, खासगी फायनान्स कंपन्या, पतसंस्थांच्या कर्जदारांना हप्ते भरण्यास सवलत दिली आहे.

तरीही काही बँका व कंपन्यांचे वसुली अधिकारी कर्जदारांकडून सक्तीने कर्जाचे हप्ते वसूल करीत आहेत. तरी ही वसुली थांबवण्यात यावी, यावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संंबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुजित चव्हाण, विराज पाटील, शिवाजीराव जाधव, सरदार तिप्पे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर