...तर सर्किट बेंचसाठी विधिमंडळ कामकाज बंद पाडू: मुश्रीफडिसेंबरपासूनच्या साखळी उपोषणाची सांगताकोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचसाठी गरज पडल्यास सर्वांना एकत्रित करुन विधिमंडळाचे कामकाज बंद पाडू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी साखळी उपोषणाच्या सांगतावेळी दिला.कोल्हापूर सर्किट बेंचचे साखळी उपोषण सुरु होऊन १०० दिवस पूर्ण झाले.पण, या मागणीकडे सरकार डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे या प्रश्नी पुढील आठवड्यापासून आंदोलन उग्र्र करण्यात येणार आहे. यामुळे यापुढील काळात सर्किट बेंचचे आंदोलन तापण्याची शक्यता आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात व्हावे या मागणीसाठी येथील न्यायसंकुल इमारतीच्या आवारात एक डिसेंबर २०१६पासून साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला १०० दिवस पूर्ण झाले. या उपोषणात सहा जिल्ह्यातील वकिलांसह विविध पक्ष,संघटना आदींनी विविध मार्गांने आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर निर्णय घ्यावा,अशी मागणी होत आहे. दरम्यान, कोल्हापूरसह सहा जिल्हयातील आमदारांनी सर्किट बेंचप्रश्नी विधिमंडळात लक्षवेधी मांडली आहे. त्यावर २० मार्च रोजी चर्चा होणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे यांनी दिली आहे.
...तर सर्किट बेंचसाठी विधिमंडळ कामकाज बंद पाडू: मुश्रीफ
By admin | Published: March 11, 2017 3:45 PM