शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

'सूळकूड’ पाणी योजनेचा हट्ट सोडा, अन्यथा रक्तपात मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

By राजाराम लोंढे | Published: August 26, 2023 10:08 PM

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विराट मोर्चाचे नियोजन, इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्ट

राजाराम लोंढेकाेल्हापूर : इचलकरंजी महापालिकेने सूळकूड पाणी योजनेऐवजी ‘कृष्णा’ नदीवरून सुरू असलेली पाणी योजनाच पूर्ण करावी. सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने इचलकरंजीवासीयांनी ‘सूळकूड’ योजनेचा हट्ट सोडावा, अन्यथा रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिला. याबाबत दोन दिवसांत आपण व खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यांना लोकभावना सांगू, तरीही निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून रस्त्यावरील लढाईस सुरुवात करूया, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रीमंडळातील जबाबदार मंत्र्यानेच रक्तपाताची भाषा जाहीरपणे केल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते, त्यामध्ये मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीसाठी ‘कृष्णा’ नदीवरून नवीन १६ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, केवळ ७ किलोमीटरचे काम राहिले असून ‘सूळकूड’साठी मंजूर झालेला निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी वापरावा. ‘सूळकूड’मधून पाणी देण्याचा विषय संपला आहे, त्यावर आता कोणीही चर्चाच करू नये.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध नाही, पण ते दूधगंगेतून देता येणार नाही. ‘धामणी’तून पाणी मिळणार असून पंचगंगेच्या प्रदूषणाबाबतही लवकरच निर्णय घेऊ. ११ सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलावल्याचे समजते, त्याच दिवशी विराट मोर्चा काढूया.

 ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे राजकारण सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय वेदना कळणार नाहीत.कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील ६७ गावे दूधगंगेच्या कार्यक्षेत्रात आहेत. या योजनेचा आम्हाला अधिक फटका बसणार असून तुमच्या लढ्यात सीमाभागातील बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतील.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दूधगंगा बचाव कृती समितीचे निमंत्रक के.पी. पाटील, अंबरीश घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, उल्हास पाटील, उत्तम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार प्रकाश आबीटकर, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, वीरेंद्र मंडलिक, अनिल ढवण, भूषण पाटील, सागर कोंडेकर आदी उपस्थित होते.

इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्टसूळकूड योजना रद्द झालीच पाहिजे, त्याचबरोबर दूधगंगेच्या गळतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ‘दूधगंगा’ धरणाचा मूळ आराखडा तपासण्याची वेळी आली असून इचलकरंजीच्या जनतेची मागणी नाही, तेथील नेत्यांचा हट्ट असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले.

तुमची घाण धुण्यासाठी धरण बांधले का?

आमदार असताना जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रकाश आवाडे हे पंचगंगा धुण्यासाठी पाणी सोडण्याचे आग्रह करत होते. पण, तुमची घाण धुण्यासाठी आमच्या आईबाबाने धरण बांधले का, असा सवाल के. पी. पाटील यांनी केला. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर