शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:49 AM

कोल्हापूर : काही दिवसांपासून महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हाॅट्सॲप ग्रुपवरील 'काम देताना जे ठरलंय ते करायचं, जास्त लांबड लावायची नाही' ...

कोल्हापूर : काही दिवसांपासून महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हाॅट्सॲप ग्रुपवरील 'काम देताना जे ठरलंय ते करायचं, जास्त लांबड लावायची नाही' असा संदेश सगळीकडे व्हायरल झाला. या टक्केवारी प्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी येथील आम आदमी पार्टीतर्फे महापालिकेसमेार मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलेे. प्रतिकात्मकपणे टक्केवारीची हंडी फोडून लक्ष वेधले. यावेळी टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

महापालिकेच्या विकासकामातील टक्केवारीचे पितळच व्हॉट्सॲपवरील त्या संदेशावरून उघडे पडले आहे. महापालिकेतील टक्केवारी पद्धतीचा विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टीने 'हंडी फोड' आंदोलन केले. दुपारी बाराच्या सुमारास 'आप'चे पदाधिकारी व कार्यकर्ते महापालिकेसमोर एकत्र आले. त्यांनी 'टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा', 'ढपला संस्कृती बंद झालीच पाहिजे', 'टक्केवारीत सामील असलेल्या कारभाऱ्यांचा धिक्कार असो' अशा घोषणा देण्यात आल्या. टक्केवारीची हंडी सजवून १८ टक्के असा उल्लेख त्यावर केला गेला होता.

याप्रसंगी ‘आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, तब्बल १८ टक्के रकमेच्या टक्केवारीचा उल्लेख असलेला व्हायरल संदेश गंभीर आहे. टक्केवारीत जनतेचा पैसा लुबाडून 'ढपला' संस्कृती रूढ करत शहराचे नाव बदनाम केले जात आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घातला गेला नाही तर कोल्हापुरात एकही प्रकल्प पूर्णत्वास जाणार नाही. सन २००९ साली सुरू झालेली नगरोत्थान योजना, अमृत योजना, थेट पाईपलाईन योजना अशा अनेक योजना टक्केवारीमुळे अर्धवट राहिल्या. या प्रवृत्तीला आम आदमी पार्टी कायम विरोध करत राहील.

यावेळी आपचे युवा अध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, किशोर खाडे, विजय हेगडे, बसवराज हादीमनी, संतोष चलवदी, भाग्यवंत डाफळे, सुधाकर शिंदे, प्रकाश हरणे, विजय भोसले आदी उपस्थित होते.

फोटो : ३१०८२०२१-कोल- आप हंडी

कोल्हापुरातील महापालिकेसमोर मंगळवारी आपतर्फे टक्केवारीची हंडी फोडण्याचे अनोखे आंदोलन केले. यामध्ये संदीप देसाई, उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले आदी सहभागी झाले होते.