पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवून नदी प्रदूषण करणारे घटकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी व निवेदन प्रादेशिक आधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना रूकडी येथील सामजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच अमित भोसले यांनी दिले आहे.
निवेदनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची प्रमुख नदी असलेली पंचगंगा जिल्ह्याची जीवनदायी असून या नदीवर पाणी पुरवठा, शेती, उद्योगधंदे व नागरिक अवलंबून असून या सर्व घटकाना सध्या दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर महानगरपलिका, उद्योगधंदे, कारखाने यांच्याकडून नदी प्रदूषित होत असून सध्या या नदीकाठच्या गावांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता वरील मागणीची दखल घेऊन पंचगंगा नदीमध्ये दूषित पाणी मिसळणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सर्व ग्रामपंचायतच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यानी दिला आहे. या निवेदनावर सचिन पाटील चोकाक, सागर पाटील अतिग्रे, अभय पाटील, उमेश पाटील माले, राजेश पाटील तिळवणी, बालेचंद जमादार हेरले, शिवाजी पाटील साजणी, संजू पुंडलिक कोळी, सुधीर उपाध्ये, राजाराम बनकर, संजू बाबासो भोसले, राहुल बागडी, मनोज कोळी, इब्राहिम मकंनदार, बाशू बाणदार, सतीश कुंभार, विठ्ठल कुंभार यांच्या स्वाक्षरी आहेत.