कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला.
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अर्धा तास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या निषेधासह सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना कॉ. अनिल चव्हाण यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाजप सरकारला निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असून त्यांना जागे करण्यासाठी आक्रमक आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून रस्ता रोको केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
निम्मा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे, शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, पण सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक दिसत नसल्याचे बी. एल. बरगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
पोलीसांनी हस्तक्षेप करत आंदोलन कर्त्यांना बाजूला केल्यानंतर वहातूक पुर्ववत सुरू झाली. यावेळी अॅड. अजित पाटील, आदम मुजावर, नारायण मोरे, विलास चौगले, भिकाजी पाटील, आंनदा तिटवे, उत्तम चौगुले, संपत दळवी, संग्राम मांगलेकर आदी उपस्थित होते.नोटाबंदीमुळे व्यवसाय संपले!
नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, असे केंद्र सरकारने सामान्य माणसाला भासवले. नोटाबंदी नंतर शेतकºयांचे कंबरडे मोडलेच पण त्याचबरोबर व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगारी वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.