कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेचे तीव्र पडसाद दुसºया दिवशी बुधवारी जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यात विविध शहरांत, गावात, ठिकठिकाणी रास्ता रोको, काही ठिकाणी एसटीवर दगडफेक, वाहनांची तोडफोड, निषेध सभा, निदर्शने करून या घटनेचा निषेध आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे करण्यात आला. यामुळे महाराष्ट्र बदंला काही हिंसक घटनांनी गालबोट लागले.रुकडी, माणगाव, साजणी, तिळवणी येथे बंदरुकडी माणगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ रुकडी, माणगाव, साजणी, तिळवणी येथे कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, साजणी येथे वाहनावर दगडफेक करण्यात आली.माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर याठिकाणी सुनील चव्हाण, नंदकुमार शिंगे, सुंदर कांबळे यांनी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर गावातून निषेध रॅली काढण्यात आली.रॅली माणगाव फाटा येथे आल्यानंतर मुख्य मार्गावर रस्ता रोको करण्यात आला. येथे भीमसैनिकांसह महिलांनी रस्त्यातच ठिय्या मारला. यामुळे वाहनांची लांबच्या लांब रांग लागली होती.रुकडी येथे शुक्रवारी सायंकाळीच निषेध रॅली काढण्यात आली होती. मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मंगळवारी गावबंद ठेवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष सतीश कांबळे, नंदकुमार शिंगे, सुभाष कांबळे, शरद कांबळे, संतोष रुकडीकर, अतीश शिंगे उपस्थित होते. बुधवारीही रुकडी येथील व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.साजणी येथे एका चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत वाहनाच्या मागील व पुढील काचेचा चक्काचूर झाला. याठिकाणी एका व्यावसायिक वाहनावरही दगडफेक करण्यात आली.दरम्यान, हेरले, चोकाक, अतिग्रे, साजणी, तिळवणी येथील मुख्य मार्गावर रस्ता रोको करण्यात आला होता. बºयाच ठिकाणी टायर पेटवून दिल्याने वाहतूक बंद होती.आज रुकडी बंदकोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज रुकडी बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.राधानगरीत बंद, रास्ता रोको आंदोलनराधानगरी : राधानगरी तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी चळवळीतील विविध संघटनांच्यावतीने राधानगरीत बंद, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राधानगरी शहरातून फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेची न्यायालयीन चौकशी करून दंगलखोरांवर व समाजात जातीय तेढ निर्माण करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत रास्ता रोको केला. यामुळे दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एसटी वाहतूकही बंद राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना देण्यात आले.यावेळी पंचायत समिती सभापती दिलीप कांबळे, भीमराव कांबळे,प्रा. चंद्रशेखर कांबळे, उमेश शिंदे, संजय कांबळे, यशवंत कांबळे, व्ही. के. कांबळे, रवी मरगळे, संभाजी कांबळे, शशिकांत कांबळे, यांच्यासह दलितबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मलकापूरसह शाहूवाडी तालुक्यात बंदमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील दलित संघटनांच्यावतीने शाहूवाडी तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दलित कार्यकर्त्यांनी शाहूवाडी, बांबवडे येथे रास्ता रोको केला.बुधवारी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांसह इतर दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून आंबा, मलकापूर, शाहूवाडी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढल्यामुळे मलकापूर, आंबा, शाहूवाडी, आदी बाजारपेठेतील दुकाने खासगी वाहतूक, रिक्षा, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. तर मलकापूर आगारातील एस. टी. सेवा बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खासगी वडाप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत येऊ शकले नाहीत. बांबवडे येथे भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बांबवडे येथे रास्ता रोको करून बांबवडे बाजारपेठ बंद ठेवली. बांबवडे, सरूड येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.आंदोलनात प्रकाश कांबळे, गौतम कांबळे, भाई भारत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, विश्वास कांबळे, गोपाळ पाटील, सागर कांबळे, अनिल कांबळे, आर. एस. कांबळे, आदींसह भारतीय बौद्ध महासभेसह दलित संघटनांचे पदाधिकारी सामील झाले होते.कोल्हापूर-राधानगरी मार्गावर रास्ता रोकोआमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथे आंबेडकर अनुयायांनी कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने या राज्यमार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.यावेळी राधानगरी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त केला होता. त्यामुळे शांततेत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दयानंद कांबळे, आनंदराव कांबळे, चंद्रकांत कांबळे, विराज कांबळे, एम. आर. कांबळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हुपरी, यळगूड, रेंदाळला बंदहुपरी : महाराष्ट्र बंदला हुपरी, यळगूड, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हुपरी येथील भीमसैनिकांनी अत्यंत शांततेने मोठा निषेध मोर्चा काढून बसस्थानकासमोर रास्ता रोको केला. रांगोळी येथे पेटत्या टायर रस्त्यावर टाकून इचलकरंजी मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद पाडली. हुपरी परिसरातील सर्वच गावांत अगदी कडकडीत व शांततेत बंद पाळण्यात आला. परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली होती.शाहूनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध मोर्चास सुरुवात झाली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (गुरूजी) व हिंदू एकताचे मिलिंद एकबोटे यांच्या निषेधाच्या व डॉ. आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देत शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा सिद्धार्थनगरमधील समाज मंदिरासमोर आला. तेथे निषेध सभा घेण्यात आली.पन्हाळ्यात बंद शांततेतपन्हाळा : पन्हाळा येथे बुधवारी दिवसभर सर्व व्यव्हार बंद ठेवण्यात आला. पन्हाळा शहरातील सर्व दलित बांधवांनी सकाळी बाजीप्रभू पुतळा ते नगरपरिषद आशी निषेध रॅली काढली. यात नगराध्यक्षा रूपाली धडेल व सर्व नगरसेवक सामील होऊन ही रॅली तहसील कार्यालयाकडे आली. या ठिकाणी जाहीर सभा होऊन तहसीलदार रामचंद्र चोबे यांना निवेदन दिले. यावेळी पन्हाळ्यातील सर्व व्यापारी, हॉटेल, छोटे खाद्यगाडे यांनी पाठिंबा दर्शवत दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवत असल्याचे सांगितले.कसबा तारळेत बंदकसबा तारळे : राज्यव्यापी बंदला राधानगरी तालुक्यातील कसबा तारळेसह परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वच व्यापाºयांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध केला.दलितबांधवांनी गावच्या मुख्य बाजारपेठेतून निषेध फेरी काढून बुधवारी (दि. ३) संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाºयांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.बुधवारी सकाळी पुन्हा सर्वच दलितबांधव बाजारपेठेतील मुख्य चौकात जमा झाले. यावेळी भीमा कोरेगाव येथील घटनेस जबाबदार असणाºयांचा शोध घेऊन त्यांच्यावर निष्पक्षपाती कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. दरम्यान, कसबा तारळेसह गुडाळ, खिंडी व्हरवडे, आवळी, आणाजे, तरसंबळे, पिरळ, आदी गावांतील दलितबांधव व आंबेडकर अनुयायांनी पुकारलेल्या बंदला नागरिकांनी पाठिंबा दिला. .पेठवडगाव कडकडीत बंदपेठवडगाव : येथील अत्यावश्यक सेवा, बँका, शासकीय कार्यालये वगळता दुकाने बंद करून बंद पाळण्यात आला. भारीप बहुजन महासंघाच्यावतीने बंदची हाक दिली होती. या बंदमुळे गावातील सर्व चौकांत शुकशुकाट पसरला होता. कोणताही अनुचित प्रकार न होता बंद शांततेत पार पडला. मौजे तासगाव, भादोले, अंबप (ता. हातकणंगले) येथेही सर्व भीमसैनिकांनी बुधवारी बंद पुकारून कोरगाव भीमा येथील घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी मौजे तासगाव येथील भीमसैनिकांनी समाजकंटकाचा पुतळा दहन केला. या बंदमुळे प्रवाशांचे हाल झाले.दरम्यान, महात्मा फुले सूतगिरणीमध्ये झालेल्या निषेध सभेत सूतगिरणीचे संस्थापक जयवंतराव आवळे व सूतगिरणीचे अध्यक्ष राजू आवळे यांनी निषेध करून या घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
रास्ता रोकोसह जिल्ह्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:35 AM