शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

आक्षेपार्ह मजकुराच्या पुस्तकांची विक्री थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:24 AM

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत, त्यांची ...

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत, त्यांची विक्री तात्काळ थांबवावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी फडके बुक हाऊसला केली. बी. ए. अभ्यासक्रमातील इतिहास विषयाची पुस्तके यापुढे विद्यापीठाने प्रकाशित करावी, अशी शिफारस इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळाने केली.

फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या बी. ए. भाग तीन (सेमिस्टर पाच) ‘मराठ्यांचा राजकीय इतिहास’ या पुस्तकावर आधारित इतिहास सुपर गाईडसह अन्य दोन विषयांच्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यासह या बुक हाऊसवर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबतची कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी या बुक हाऊसला सूचना करणारे पत्र पाठविले. फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाल्याची बाब अतिशय गंभीर आहे. या पुस्तकांमध्ये विद्यापीठाच्या नावाचा उपयोग करण्याकरिता विद्यापीठाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर आणि विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत आणि त्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी. यापुढे विद्यापीठाच्या नावाचा वापर करून महापुरुषांची बदनामी होईल, असा कोणताही मजकुर छपाई करण्यात येणार नाही. याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासंदर्भात केलेली कार्यवाही तात्काळ विद्यापीठ कार्यालयाला कळविण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठात अभ्यासमंडळाची बैठक झाली. त्यात संबंधित सर्व पुस्तके प्रकाशकांनी मागे घ्यावीत. इतिहास अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यापीठाने प्रकाशित करावीत, अशी शिफारस या मंडळाने विद्यापीठाला केली.

प्रतिक्रिया

आक्षेपार्ह मजकूर आणि परवानगीशिवाय विद्यापीठाच्या नावाचा वापर केल्याचा प्रकार विद्यापीठाने संवेदनशीलपणे, गांभीर्याने घेतला आहे. या पुस्तकांची विक्री थांबविण्यासह ती मागे घेण्याबाबतचे पत्र फडके बुक हाऊसला दिले आहे.

-डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव