शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्जमाफीवरून अधिवेशन बंद पाडू : हसन मुश्रीफ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:08 AM

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही,

ठळक मुद्देप्रतापसिंह चव्हाण यांच्या कामाने जिल्हा बँकेला पुनर्वैभव बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही, यासाठी शासन नियमांत बदल करण्याची गरज आहे. ते न झाल्यास दि. ११ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.शाहूपुरीतील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, भैया माने, सर्जेराव पाटील-पेरिडकर, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, अशोक चराटी, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने दि. १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणारे शेतकरी समाविष्ट केले आहेत; परंतु ऊसकरी शेतकरी हे १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कर्ज भरतात. त्यामुळे त्यांंना कर्जमाफीचा लाभ होवू शकत नाही. त्यासाठी सरकारला नियम बदलावे लागतील, अधिवेशन सुरू होईपर्यंत यासाठी वाट पाहू, अन्यथा ११ डिसेंबरपासून सुरू होणारे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊ देणार नाही.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी चांगले काम करून बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याचे गौरवोदगार मुश्रीफ यांनी काढले. बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय घेतले. त्यांच्या या शिस्तबद्ध कार्यप्रणालीमुळे त्यांनी मार्चपर्यंत थांबून बँकेच्या ठेवी ६००० कोटींपर्यंत न्याव्यात, कर्मचाºयांचा बोनस यासह विविध विषय हाती घेऊन बॅँकेच्या वैभवात आणखी भर पाडावी अशी इच्छा होती, परंतु त्यांना सांगली जिल्हा बँकेकडे जाणे क्रमप्राप्त आहे, तरीही त्यांनी या बँकेकडे लक्ष द्यावे.बँक अडचणीतून बाहेर : प्रतापसिंह चव्हाणप्रतापसिंह चव्हाण म्हणाले, जिल्हा बँकेसाठी आपल्याला शक्य होते तितके योगदान देऊन ती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. एप्रिल २०१२ मध्ये बँकेच्या प्रशासकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर असणारे उणे नेटवर्थ, उणे सी.आर.ए.आर., निधीची चणचण, एनपीएचे प्रमाण, संचित तोटा अशा बाबींवर मात करत सर्व संचालकांसह कर्मचाºयांच्या सहकाºयाने मार्च २०१७ चा ताळेबंद आपण रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या निकषांप्रमाणे काढू शकलो. त्याचबरोबर बँकेस सीआरएआर १०.७ ठेवून जिल्हा बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून असणारा परवाना अबाधित ठेवू शकलो याबाबत समाधानी आहे.सीईओपदी शिवाजी वाघ यांच्या नावाचा ठरावबॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे सांगली जिल्हा बॅँकेत रुजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे सरव्यवस्थापक शिवाजी ठकराम वाघ यांची नियुक्ती व्हावी, असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तशी मागणी करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.