शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कर्नाटकला जाणारे पाणी थांबवा...

By admin | Published: April 13, 2017 10:51 PM

जिल्ह्यातील आमदारांची मागणी : कोयना धरणाकाठची गावे दुष्काळी होण्याची व्यक्त केली भीती

सातारा : कोयना धरणातून कर्नाटक राज्याला पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी जिल्हा टंचाई आढावा बैठकीत केली. अडीच टीएमसी पाणी गेल्यास कोयना धरणाच्या काठी असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन भवनामध्ये टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कर्नाटक राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोयना धरणातून २.६४ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडायला सुरुवात झाली. याचे पडसाद गुरुवारी झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीत उमटले. ‘कोयनेतून कर्नाटला पाणी सोडायचा निर्णय हा लोकप्रतिनिधींनी अंधारात ठेवून घेतला आहे. कोयनेत मागील वर्षीपेक्षा दुप्पट पाणी साठा असल्याची दिशाभूल करणारी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कोयना धरणाच्या काठावर असणारी गावे दुष्काळग्रस्त होतील,’ अशी भीती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. यावर पालकमंत्र्यांनी खुलासा करताना ‘कोयना धरणातील जितके पाणी आपण कर्नाटक राज्याला देणार आहोत, तितकेच पाणी येत्या पावसाळ्यानंतर कर्नाटक आपल्याला देणार आहे, त्याचा रितसर करार सरकारने केला आहे,’ असे सांगितले. मात्र, ‘आपल्याला पुरेसे पाणी उरणार नाही. उन्हाळ्यात गावांना टंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा,’ असे मत आमदार देसाई यांनी व्यक्त केले. त्यांना आमदार मकरंद पाटील यांच्यासह इतर आमदारांनीही पाठिंबा दिला. ‘आमच्याकडे जास्त पाऊस पडतो. मात्र, इतरांना पाणी देण्याच्या नादात आम्ही दुष्काळी व्हायला लागलोय,’ अशी खंत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)