शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

साडेअकरा हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नव्या वर्षामध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठीची जय्यत तयारी प्रशासन आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नव्या वर्षामध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठीची जय्यत तयारी प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या पातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात साडेअकरा हजार लिटर लस साठवणूक करण्याची क्षमता असून, या माध्यमातून ४५ लाख ३९ हजार सात डोस दिले जाणार आहेत. मात्र पोर्टलवर नावनोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस उपलब्ध होणार नाही.

कोरोनाची लस देण्यासाठीचे नियोजन सर्वच पातळ्यांवर सुरू आहे. जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नंतरच्या आठ दिवसांमध्ये गट अ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. ही संख्या २० हजारांच्या पुढे आहे. यानंतर लगेचच दुसरा टप्पा सुरू होईल. ब गटासाठी दुसरा टप्पा असून यामध्ये संख्या अधिक असणार आहे. त्यानंतर क गटासाठी लसीकरण सुरू होणार आहे. तिसरा टप्पाही जास्त दिवस चालण्याची शक्यता आहे.

लस देण्यात येणाऱ्या प्रत्येकाची सविस्तर नोंदणी केली जाणार असल्याने नावनोंदणीशिवाय एकालाही लस दिली जाणार नाही. यासाठी सध्या संबंधित विभागांना पोर्टलवर अधिकारी, कर्मचारी यांची नावे नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील अ गटातील लस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. हा ताण नंतरच्या ब आणि क गटांत वाढणार आहे.

अ गट

वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्सेस, सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील सर्व कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी.

ब गट

पोलीस दल, नागरी दल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी.

क गट

५० वर्षांवरील सर्व नागरिक आणि ज्यांना जुने आजार आहेत असे नागरिक

चौकट

प्रत्येक केंद्रावर तीन खोल्या

लसीकरण करावयाच्या प्रत्येक केंद्रावर तीन खोल्या राहणार आहेत. पहिल्या खोलीमध्ये संबंधितांची नोंदणीनुसार खातरजमा केली जाईल. दुसऱ्या खोलीत प्रत्यक्ष लस दिली जाईल; तर तिसऱ्या खोलीत अर्ध्या तासासाठी संबंधितांना बसवून ठेवण्यात येईल. ज्याला रिकव्हरी रूम म्हटले जाईल.

चौकट

दोन, तीन वेळा डोस घ्यावे लागणार

शासनाकडून चार कंपन्यांचे व्हॅक्सिन पुरवण्यात येणार आहेत. यातील एका कंपनीचे डोस दोन वेळा घ्यावे लागणार आहेत; तर तीन कंपन्यांचे डोस तीन वेळा घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हीच प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे.

चौकट

लस साठवण उपलब्धता

जिल्हास्तरीय साठवण क्षमता - ६८७ लिटर

जि.प.व नगरपालिका साठवण क्षमता - ९१३१ लिटर

कोल्हापूर महापालिका क्षमता - १५२६ लिटर

एकूण - ११,३४४ लिटर

चौकट

जिल्हा परिषदेची तालुकावार साठवण क्षमता

तालुका लस साठवण क्षमता लिटरमध्ये

आजरा ३२३

भुदरगड ३२९

चंदगड ४६६

गडहिंग्लज ६९९

गगनबावडा १३८

हातकणंगले १३८१

कागल ५८५

करवीर १०६३

पन्हाळा ६२३

राधानगरी ७१६

शाहूवाडी ७०२

शिरोळ ७३४

एकूण ७७५९

चौकट

१०० हून अधिक वाहने

लस वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांच्या रुग्णवाहिकांचा वापर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील ७५ गाड्या यासाठी वापरण्यात येतील. कोल्ड बॉक्समधून ही वाहतूक करावयाची असल्याने यासाठी आवश्यक वाहने उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.

कोट

राज्य शासनाने दिलेल्या मागंदर्शक सूचनांप्रमाणे सध्या पहिल्या टप्प्यातील अ गटातील लस देण्यासाठी पात्र असणाऱ्यांची माहिती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा संस्थात्मक पातळ्यांवर हे काम सुरू आहे. साठवणुकीची जिल्ह्याची क्षमता चांगली असून त्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे.