कोल्हापूर : एचआयव्ही-एड्स, लैंगिक व प्रजनन संबंधी आजार यावरील औषधे तसेच एचआयव्ही टेस्टिंग किट्स, नवजात बालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक औषधे तसेच केंद्रांना आवश्यक असणारी साधने पुरविण्याकरिता छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या विभागीय औषध व साधनसामग्री भांडाराचे उद्घाटन बुधवारी जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे (नॅको) विभागीय पुरवठा व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या या विभागामध्ये एचआयव्ही-एड्स, लैंगिक व प्रजननासंबंधी आजार यावरील औषधे तसेच एचआयव्ही टेस्टिंग किट्स, नवजात बालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक औषधे तसेच केंद्रांना आवश्यक असणारी साधने या जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या विभागीय औषध व साधनसामग्री भांडारामार्फत पुरविण्यात येतात.
या कार्यक्रमासाठी नॅकोचे विभागीय पुरवठा व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती सागावकर, डॉ. विद्या खानोलकर, औषध निर्माता राहुल दहिरे तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे व एआरटी केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
भांडार उभारणीसाठी प्लॅन इंडिया एससीएम प्रकल्पाकडून आर्थिक साहाय्य मिळाले. हे भांडार सुरू करण्यासाठी प्लॅन इंडिया संस्थेचे तौकीर अहमद, टीना कुवर तसेच तेजस छावडा यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच या भांडार निर्मितीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांचे सहकार्य लाभले.
चार जिल्ह्यांना मिळणार लाभ
कोल्हापूर जिल्ह्यात एचआयव्ही-एड्स संसर्गितांसाठी समुपदेशन चाचणी केंद्रे तसेच (एआरटी) औषध केंद्रे कार्यरत आहेत. या सर्वांवर सीपीआर हॉस्पिटलच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत नियंत्रण केले जाते. सीपीआरमध्ये सुरू झालेल्या या औषध भांडाराचा सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील समुपदेशन व चाचणी केंद्रे तसेच (ए.आर.टी.) एच.आय.व्ही. विषाणूविरोधी औषध केंद्रे यांना लाभ होणार आहे.
----------------------------------------
फोटो :09062021-kol-Aids cantroll center
फोटो ओळी : कोल्हापुरातील सीपीआरच्या आवारात एचआयव्ही-एड्स, संदर्भातील औषध भांडाराचे उद्घाटन नॅकोचे विभागीय व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर आदी उपस्थित होते.
(बातमीदार : संदीप आडनाईक)
===Photopath===
090621\09kol_1_09062021_5.jpg
===Caption===
फोटो :09062021-kol-Aids cantroll centerफोटो ओळी : कोल्हापूरातील सीपीआरच्या आवारात एचआयव्ही-एड्स,संदर्भातील औषध भांडाराचे उद्घाटन नॅकोचे विभागीय व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर आदी उपस्थित होते.(बातमीदार : संदीप आडनाईक)