शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

वादळाचा जोर कायम

By admin | Published: October 09, 2015 1:00 AM

ट्रॉलर्सना ‘मालवण’चा ‘आधार’ : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती

मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बुधवारी रात्रीपासून वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढल्याने मासेमारीसाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्सनी सुरक्षेच्या दृष्टीने बुधवारी रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मालवण बंदराचा आधार घेतला आहे. (पान १ वरून)सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीड-पर्ससीन व विनापरवाना मिनी पर्ससीन ट्रॉलर्स आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात वादाची ठिणगी भडकली असल्याने पोलीस दलाला मिळालेल्या आदेशानुसार अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात या नौकांना मालवण बंदरात आश्रय देण्यात आला आहे. दरम्यान, समुद्री वादळाचा जोर येत्या ४८ तासात कायम राहण्याचा संदेश प्राप्त झाल्याने दोन दिवस या नौका मालवण बंदरातच आश्रय घेतील, अशी माहिती मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी गावडे यांनी दिली आहे. वादळी वाऱ्यांचा जोर कमी झाल्यानंतर या नौकांना सोडण्यात येणार आहे. यात १९ ट्रॉलर्सपैकी तामिळनाडू येथील दोन, कर्नाटक येथील एक व केरळच्या १६ ट्रॉलर्सचा समावेश आहे. यातील १७ ट्रॉलर्स काल रात्री उशिरा तर दोन ट्रॉलर्स गुरुवारी सकाळी मालवण बंदरात दाखल झाले. (प्रतिनिधी)अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पुणे येथील वेधशाळेचे हवामान तज्ञ दिनेश मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. केरळ, कर्नाटक भागात खोल समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गोवा, सिंधुदुर्गच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. येत्या ४८ तासात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यास समुद्रात वाऱ्यासह पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. मासळीची लूट होण्याची भीतीपरराज्यातील हे हायस्पीड ट्रॉलर्स आश्रयासाठी मालवणात आले आहेत. हे ट्रॉलर्स १२ नॉटीकल मैल राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासळीची लयलूट करतात. आता हे ट्रॉलर्स आमच्याकडे आले आहेत. त्यांना आश्रय देऊन त्यांची सुरक्षा करणे ही आम्हा पारंपरिक मच्छिमारांची जबाबदारी आहे. मात्र, समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराचा आश्रय घेतला जातो, मग अशा स्थितीत या ट्रॉलर्र्सना मालवणात आश्रय दिला गेला आहे. वादळाच्या नावाखाली आश्रय घेऊन परतत असताना ट्रॉलर्सकडून मासळीची लयलूट केली जाण्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.