कोल्हापूर : कसबा बावडा येथे ७५ कोटी रुपये खर्चून उभारलेले घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरत असून, नेहमीप्रमाणे जयंती नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत न्यायालयाने बॅँक गॅरटी जप्त व महापालिका बरखास्तीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने ‘एसटीपी’ (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण करून २० एप्रिलपासून एसटीपीमध्ये प्रतिदिन ६० दशलक्ष लिटर (एमएलडी)हून अधिक मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्षात रात्रीच्यावेळी केंद्र बंद ठेवून नफा कमावला जात आहे. जयंती नाल्यावर पुरेशी दूषित पाणी उपसा यंत्रणा नसल्याने शहरात पडलेल्या हलक्या पावसानेही नाला दोन-दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे चोवीस तासांत २०० एमएलडीहून अधिक दूषित पाणी थेट नदीत मिसळले. परिणामी नदीकाठावरील गावांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.न्यायालयाच्या कारवाईच्या धास्तीने तातडीने प्रकल्प पूर्ण केल्याचे महापालिकेने दाखविले असले तरी प्रत्यक्षात जयंती नाल्यातून उपसा करण्यात येणाऱ्या सर्व पाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. दिवसा तोंडदेखलेपणासाठी केंद्र सुरू ठेवले जात आहे.(प्रतिनिधी)प्रकल्पाचा नागरिकांना भुर्दंडमहापालिकेने दोन वर्षांपासूनच पाणीपट्टी बिलात १० ते १५ टक्के वाढ केली आहे. सांडपाणी अधिभार सुरू करून हे पैसे संबंधित ठेकेदारास प्रक्रिया केंद्र चालविण्याच्या भाड्यापोटी देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अधिभाराची नऊ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मनपाकडे जमा आहे. ठेकेदाराने ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम भागविण्यासाठी नागरिकांवर सांडपाणी अधिभार लावला आहे. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशालाही चाट लागणार आहे.विषारी विळखाप्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी. ओ. डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम. जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतो, तर सांडपाण्याचा बीओडी २०० एम. जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असू शकतो. त्यावरून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे महत्त्व लक्षात येते.
७५ कोटींचा ‘एसटीपी’ही बिनकामी
By admin | Published: April 29, 2015 12:22 AM