शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

एसटीपी ठेकेदार ‘विश्वा इंफ्रा’स ११ कोटींचा दंड

By admin | Published: June 17, 2016 12:08 AM

स्थायी सभेत माहिती : देखभालीसाठी लवकरच नवी निविदा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे (एसटीपी) काम वेळेत पूर्ण केलेले नाही, तसेच देखभालीचे कामही समाधानकारक नसल्याने या केंद्राचे ठेकेदार विश्वा इन्फ्रा. कंपनीस ११ कोटी ४२ लाखांचा दंड करण्यात आला असून सदरचा एसटीपी देखभालीसह चालविण्यास देण्यासाठी लवकरच टेंडर काढले जाईल, अशी माहिती गुरुवारी स्थायी समिती सभेत देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. विश्वा इन्फ्रा कंपनीच्या कामाबाबत अजित ठाणेकर, सत्यजित कदम आदींनी विषय उपस्थित केला. एसटीपी प्लॅँट ‘पीपीपी तत्त्वावर’ चालविण्यास देण्यात आला आहे. ठेकेदाराने एसटीपीचे काम वेळेत पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची ४.५० कोटींची बॅँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे तसेच १५ कोटींची देयके थोपविली आहेत. आतापर्यंत त्यांना ११ कोटी ४२ लाखांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड बँक गॅरंटी तसेच देयकामधून वसूल करण्यात येईल. सिव्हीलचे काम ठेकेदाराने केले नसल्याने नवीन निविदा काढून ते पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी प्रशासनाने दिली. शहरातील कचरा उठावावर सभेत चर्चा झाली. सूरमंजिरी लाटकर यांनी या विषयाकडे लक्ष वेधताना दोन दिवसांत जर कामांत सुधारणा झाली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला तेव्हा मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी, पाच आरसी वाहने सुरू असून जादा सहा डंपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कचरा उठावाचे काम तीन पाळीत सुरू करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी विविध विषयांवरील चर्चेत जयश्री चव्हाण, रूपाराणी निकम, नीलोफर आजरेकर, उमा इंगळे आदींनी भाग घेतला.