शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

‘नानां’ना बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती

By admin | Published: October 21, 2015 12:08 AM

अखेरच्या टप्प्यातील घडामोडी निर्णायक : ताराराणी आघाडी व शिवसेनेत रंगतदार सामना

कसबा बावडा : भोसलेवाडी-कदमवाडी या सर्वसाधारण गटासाठी खुल्या असलेल्या प्रभाग क्र. ८ मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सत्यजित कदम (ताराराणी आघाडी) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांनी व्यूहरचना आखली आहे. कदम व शिवसेनेचे उपशहर प्रमुख अरविंद मेढे असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीने मकरंद जोंधळे यांना, काँग्रसने दीपकसिंह पाटील यांना, तर बहुजन विकासने सुंदर मोरे यांना उमेदवारी दिली आहे. हे सर्व उमेदवार आपला प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून सत्यजित कदम यांच्याकडे पाहतात. या-ना-त्या प्रकारे कदम यांना रोखण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पक्षाचे नेतेही व्यूहरचनेत सहभागी आहेत. कदम यांचा प्रचार मात्र अगदी आखीव-रेखीव असा पद्धतशीरपणे आणि नियोजन पद्धतीने सुरू आहे.सत्यजित कदम हे महाडिक कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक आहेत. परिसरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा निवडणूक रिंरगणात उतरले आहेत. कदम घराण्याला राजकीय वारसा असल्याने ते सर्वत्र चांगले परिचित आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते व उपशहर प्रमुख अरविंद मेढे यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. २०१० च्या महापालिकेच्या निवडणुकीत स्मिता माळी यांना भोसलेवाडी-कदमवाडी या प्रभागातून निवडून आणण्यात मेढेंचा सिंहाचा वाटा होता. आता ते स्वत: उमेदवार असल्याने शिवसेनेने आपली सर्व ताकद या प्रभागात लावली आहे. प्रभाग कदमवाडी चौकापासून ते अगदी जाधववाडी मेनरोडपर्यंत जरी पसरलेला असला, तरी सर्व पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक कार्यालये कदमवाडी मुख्य चौकात आहेत. कदमवाडी आणि भोसलेवाडीतील समीकरणे विजयाचे पारडे फिरवू शकतात. कदम आणि मेढे यांचे पारंपरिक मतदान याठिकाणीच एकवटलेले आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद जोंधळे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रचार सुरू केला आहे. प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण रिंगणात उतरलो असल्याचे ते प्रचार करताना सांगतात. काँग्रेसचे दीपकसिंह पाटील यांनीही प्रचारास जोरात सुरुवात केली आहे. बहुजन विकासचे सुंदर मोरे यांचाही प्रचार सुरू आहे. या प्रभागात एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी सत्यजित कदम व शिवसेनेचे अरविंद मेढे यांच्यातच लढत होईल असे चित्र आहे. सत्यजित कदम यांना आपण मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी होऊ, असा आशावाद आहे. मेढेही आपला विजय निश्चित असल्याचे बोलतात. राष्ट्रवादीचे उमेदवार जोंधळे यांना या दोन उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा आपणास होईल असे वाटते. काँग्रेसला मोठी परंपरा असल्याने आपला विजय नक्की असल्याची दीपकसिंह पाटील यांना आशा आहे. सुंदर मोरे यांनाही विजयाची खात्री आहे. असे जरी असले, तरी शेवटच्या क्षणाला नेमकी बाजी कोण मारणार, यावर निकाल स्पष्ट होणार आहे. प्रभागात ५५५० मतदारांची संख्या आहे. त्यात ७० टक्के मतदार हे मराठा, १५ टक्के ओबीसी, दहा टक्के बीसी, तर पाच टक्के इतर समाजाचे आहेत. त्यामुळे एका विशिष्ट समाजाची मते अमुक एका उमेदवाराला मिळतील अशी जातीनिहाय टक्केवारी होऊ शकत नाही.बिग फाईटकदमवाडी-भोसलेवाडी