कोल्हापूर : कोरोनाच्या संकटातही महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी ड्यूटी बजावत आहेत. अशा संकटात राबणाºया कर्मचाºयांना सामाजिक संघटना, संस्था बळ देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी मास्क, हँडग्लोज, गमबूट, सॅनिटायझर, साबण, सॉक्स देण्यासाठी रीघ लागली आहे.
‘कोरोना व्हायरस’ने देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शासनाच्या आवाहनानुसार सर्वजण घरात थांबून आहेत. दुसरीकडे जिवाची पर्वा न करता महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अशा कर्मचाºयांना सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सफाई कर्मचाºयांना तर प्रत्येक प्रभागात फेटे, हार घालून सन्मानित केले जात आहे. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून सर्वजण त्यांच्या मदतीसाठी धावून येत आहेत.आरोग्य कर्मचाºयांच्या मदतीसाठी हजारो हातजनतेची सेवा करणाºया आरोग्य विभागातील कर्मचाºयांची सुरक्षेसाठी हजारो लोक मदत करत आहेत. कोणी मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर तर कोणी गमबूट देत आहेत. निवडणूक कार्यालय, महापालिका मुख्य इमारतीमध्ये मदतीसाठी रीघ लागली आहे. मात्र, वाटप होणाºया साहित्याचा वापर त्यांनी करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
संस्था मास्कबँक आॅफ महाराष्ट्र ३000विश्वपंढरी, रुकडीकर ट्रस्ट १000नरके फौंडेशन २00स्वरा फौंडेशन २00लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट १२00रोटरी क्लब आॅफ होरीझन १५0बँक आॅफ इंडिया १000रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर २५0इनरव्हिल क्लब आॅफ कोल्हापूर २५0अशोक माने इन्स्टिट्यूटचे डॉ. अभिजित कुलकर्णी ३00काँगे्रस कमिटी २५0हेल्पर्स आॅफ दि हॅण्डीकॅप्ड १00निर्माण कन्स्ट्रक्शन ८५0-----------------------------------------------------------------
- संस्था हँडग्लोज
रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर २५0इनरव्हिल क्लब आॅफ कोल्हापूर २५0--------------------------------------------------------------
- संस्था गमबूट
दत्ताबाळ हायस्कूल २00विश्वपंढरी ट्रस्ट १00-------------------------------------------------------------
- संस्था सॅनिटायझर
चंद्रशेखर डोर्ले १00 बॉक्सस्वरा फौंडेशन २0 बॉटल सॅनिटायझरमाजी उपमहापौर हरिदास सोनवणे ८४0 बॉटलगणी आजरेकर २0 कॅन---------------------------------------------------------------
- संस्था साबण
स्वरा फौंडेशन १५बँक आॅफ इंडिया ९00माजी उपमहापौर दिगंबर फराकटे १९२0---------------------------------------------------------आनंद शूज १ हजार सॉक्स