शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मुख्यालय सोडल्यास डॉक्टरांवर कडक कारवाई, जिल्हा परिषद आरोग्य समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 2:28 PM

कोल्हापूर : कोरोनामुळे सध्या सर्व आरोग्य यंत्रणा व्यस्त असली तरी पावसाळ्यामुळे साथरोग आणि महापुराचा धोका समोर असल्याने त्याच्याकडे अजिबात ...

ठळक मुद्दे मुख्यालय सोडल्यास डॉक्टरांवर कडक कारवाई, जिल्हा परिषद आरोग्य समितीचा निर्णयकोरोनाकाळात साथरोग, महापुराकडे दुर्लक्ष नको

कोल्हापूर : कोरोनामुळे सध्या सर्व आरोग्य यंत्रणा व्यस्त असली तरी पावसाळ्यामुळे साथरोग आणि महापुराचा धोका समोर असल्याने त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अशा सक्त सूचना मंगळवारी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी दिल्या. पूर्ण पावसाळ्यात येणारा प्रत्येक दिवस धोक्याचा असल्याने कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांनी मुख्यालय सोडू नये; सोडल्यास कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.मंगळवारी जिल्हा परिषदेत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत व्हीसीद्वारे आरोग्य समितीची बैठक झाली. सभापती हंबीरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्यालयातून जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, सदस्य सविता भाटले यांनी उपस्थिती लावली; तर ऑनलाईनद्वारे आरोग्य समितीचे इतर सदस्य सहभागी झाले.बैठकीत कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेल्या शिरकावावर चिंता व्यक्त करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तपासण्या आणि चाचण्यांची संख्या वाढवावी, त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असेही सांगण्यात आले. आता पावसाळा सुरू झाल्याने नुसते कोरोना कोरोना म्हणत बसून चालणार नाही.

साथरोगाचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून तशी यंत्रणा तैनात करा अशा सूचना आरोग्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या. महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील आरोग्य परिस्थितीवर आतापासून लक्ष ठेवा, असे सांगून पूरबाधित जनतेसाठी अतिरिक्त औषधसाठाही करून ठेवण्यात आला आहे. गरजेनुसार त्याचा पुरवठा तातडीने करावा, असेही समितीने सांगितले. पावसाळ्यातील लसीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे आदेशही आरोग्य यंत्रणेला देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर