शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

पर्यटकांना उपाशी ठेवणारी ‘कडक’ आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:26 AM

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रात्री साडेदहानंतर सगळ्याच हॉटेल्समध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या अतिरेकी आचारसंहितेमुळे हजारो प्रवाशांवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कोल्हापुरात उशिरा येणाऱ्यांना अन्नासाठी अक्षरश: विनवणी करण्याची पाळी आली असून, केवळ कोल्हापूर, सांगलीतच ही बंधने का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या तीन हॉटेलमालकांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.जमावबंदीचे १४४ कलम लावून कोल्हापूर आणि सांगली शहरांतील हॉटेल्स साडेदहानंतर बंद करावीत, असे तुघलकी फर्मान जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या फर्मानाचा परिणाम काय होणार याचा विचार न करता याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.परंतु हा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांना बसला नाही; तर मुंबई, पुण्याहून येणाºया प्रवाशांनाही त्याचा रोज फटका बसत आहे. रात्री दहानंतर कोल्हापुरात आल्यानंतर या मंडळींना खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टॅँडजवळचे गाडे बंद केले जातात. हॉटेल्स साडेदहाला बंद केली जातात. त्यामुळे कांदेपोहे खाऊन तरी पोट भरावं म्हटलं तरी तेही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अक्षरश: छोटी मुलं बरोबर असणारे पालक हॉटेलवाल्यांना विनवणी करताना दिसत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जेव्हा हॉटेलचालकांनी या नियमाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तेव्हा मग साडेदहापूर्वी तुमच्या हॉटेलमध्ये जे ग्राहक येतील त्यांना सेवा देण्यास हरकत नाही; पण साडेदहाला शटर बंद करायचे असे सांगण्यात आले.कंपाऊंडच्या आतील जबाबदारी हॉटेलमालकांचीहॉटेलसाठी परवाना देतानाच कंपाऊंडच्या आत जे काही होईल त्याची जबाबदारी हॉटेलमालकावर टाकण्यात आली आहे. असे असताना ही जबाबदारी मालक घेत असताना पुन्हा प्रशासनाने आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांना उपाशी ठेवणारा आदेश का काढला, अशी विचारणा केली जात आहे. तुम्ही बार एकवेळ बंद ठेवा; परंतु लोकांच्या पोटावर मारू नका, असे आवाहन प्रशासनाला हॉटेलमालकांकडून करण्यात येत आहे.मोफत जेवणाची सोयजर प्रशासन या पद्धतीनेच मनमानी करीत असेल तर किमान रात्री एस. टी. स्टॅँडवर येणाºया प्रवाशांच्या जेवणाची तरी मोफत सोय प्रशासनाने करावी, अशीही मागणी या निमित्ताने केली जात आहे.तीन हॉटेल्समालक न्यायालयातकोल्हापुरातील सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, आशिष रायबागे हे तिघे हॉटेलमालक या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत.