कोल्हापूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत स्तर ४ मधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या नियमानुसार जिल्ह्यात उद्या शनिवारी व रविवारी कडक निर्बंध लागू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत सुरू राहतील. ती वगळता अन्य सर्व व्यवसाय मात्र बंद राहतील. नागरिकांनादेखील महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
राज्यात सध्या कोरोना संसर्गाची लाट ओसरत असून, अनलॉकअंतर्गत जिल्ह्यांची चार स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. शासनाने ५ तारखेला जाहीर केलेल्या नव्या अध्यादेशानुसार कोल्हापुरात अजूनही पॉझिटिव्ह व मृत्यूदर जास्त असल्याने जिल्ह्याचा समावेश स्तर ४ मध्ये आहे. यानुसार जिल्ह्यात रोज सायंकाळी पाचनंतर तसेच शनिवारी व रविवारी नागरिकांच्या फिरण्यावर कडक निर्बंध लागू असतील. त्यामुळे या दोनदिवशी जिल्हयात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने व व्यवसाय सुरू राहतील. नागरिकांनादेखील अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. हॉटेलमधील पार्सल किंवा घरपोच सेवा सुरू राहील. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत शासनाने परवानगी दिलेले व्यवहार व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
---
हे राहील बंद
-मॉर्निंग वॉक, सायकलिंग, मैदानी खेळ,
- केशकर्तनालये, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर
-चित्रीकरण
---