राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात ब्रिटिश सरकारसारखे कायदे केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, डॉ. शहाजी वारके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, बिद्री साखर कारखान्याचे संचालक मधुकर देसाई, पंडितराव केणे, शरद मोरे आदींसह आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थि होते.
दरम्यान, शिवसेनेच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, उद्योगपतींच्या लाभासाठी शेतकरी विरोधी कायदे भाजप सरकारने केले असून शेतकरी ते हाणून पाडतील, असे सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी भाषण केले.
फोटो ओळ
०८ गारगोटी
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना अर्जुन आबिटकर, प्रकाश पाटील, अविनाश शिंदे, अरुण शिंदे आदी उपस्थित होते.