जयसिंगपूर / शिरोळ / कुरुंदवाड / दत्तवाड / बुबनाळ : ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जयसिंगपूर, शिरोळसह तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. जयसिंगपूर येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र शासनाचा निषेध केला. यावेळी बसस्थानकातील बसेस अडवून वाहतूक रोखण्यात आली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरही शुकशुकाट होता.
जयसिंगपूर येथे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती स्वाती सासने, सावकर मादनाईक, पराग पाटील, रघुनाथ देशिंगे, संभाजी मोरे, शैलेश चौगुले, रमेश शिंदे, बंडा मिणीयार, चंद्रकांत जाधव, आदम मुजावर, दादा पाटील-चिंचवाडकर, सुभाष भोजणे उपस्थित होते.
कुरुंदवाड येथे ‘बंद’ला प्रतिसाद मिळाला. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, राजू आवळे, दादासो पाटील, रमेश भुजुगडे, अक्षय आलासे, अरुण आलासे, जय कडाळे, दीपक गायकवाड उपस्थित होते. दत्तवाड, नृसिंहवाडी, बुबनाळ, दानोळी, अब्दुललाट, अर्जुनवाड, यड्राव, उदगावसह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चौकट -
‘स्वाभिमानी’कडून विधेयकाची होळी
शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. हमीभावाला कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत शिरोळ येथे निवासस्थानासमोर माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी विधेयकाची होळी केली.
.............
कोट - शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हे चित्र ‘बंद’ला मिळालेल्या प्रतिसादातून पाहायला मिळाले. सर्वसामान्य जनतेने शेतकऱ्याला ताकद दिली आहे. महाराष्ट्रातून ‘बंद’ला प्रतिसाद मिळाला. कष्टकरी, छोटे उद्योजक, व्यापारी यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला, याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो.
- माजी खासदार राजू शेट्टी
कोट - शेतकऱ्यांच्या या लढाईत महाविकास आघाडी भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे रद्द करावेत. बंद यशस्वी करून सर्वांनीच केंद्राविरुद्ध रोष व्यक्त केला.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
फोटो - ०८१२२०२०-जेएवाय-०३, ०४, ०५ फोटो ओळ - ०३) शिरोळ येथे बंदमुळे संभाजी चौकात शुकशुकाट होता. ०४) जयसिंगपूर येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ०५) जयसिंगपूर येथे बसेस रोखण्यात आल्यामुळे सर्व बसेस बसस्थानकावर लावण्यात आल्या होत्या.