संघर्ष यात्रेची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून होईल. तेथून राज्यातील सर्व कॅडरच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत आणि जनजागृती करत ती यात्रा सर्व जिल्ह्यांतून जाणार आहे. तिचा समारोप ठाणे ते मुंबई पायी यात्रेने होईल. या संघर्ष यात्रेच्या सूक्ष्म नियोजनासाठी आंदोलन समिती आणि संघटना समन्वय समितीची ऑनलाइन बैठक गेल्या आठवड्यात झाली. त्यात वन विभागीय संघटनेचे शैलेंद्र भदाने यांनी यात्रेचा नकाशा आणि रोडमॅपची माहिती दिली. यापूर्वीही आम्ही ताकदीने आंदोलन केले आहे. आता राज्यातील सर्व कर्मचारी संघटना एकत्र आल्याने जुन्या पेन्शनच्या लढ्याची ताकद वाढली आहे. ‘जुनी पेन्शन’ मिळविल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नसल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
एनपीएसच्या नावाखाली सरकार आणि कर्मचारी यांची लूट होत आहे. सरकारने जुनी पेन्शन लागू करून ही लूट थांबवावी, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या रोषाला बळी पळावे लागेल.
- वितेश खांडेकर