याबाबत अधिक माहिती अशी की, गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या विहिरीत येथीलच सचिन गावडे यांचा बैल गुरुवारी सायंकाळी सातच्यासुमारास पडला. ही घटना काही ग्रामस्थांनी पाहिली आणि या बैलाला बाहेर काढण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. मात्र विहीर अत्यंत अरूंद असल्याने बैलाला बाहेर काढण्यात मर्यादा येऊ लागल्या. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने या बैलाला विहिरीतून मध्यरात्री तीन वाजण्याच्यासुमारास बाहेर काढण्यात यश आले. लाईटच्या प्रकाशात तब्बल आठ तास बैलाचा जीव वाचविण्यासाठी चाललेली धडपड अखेर सार्थकी लागली.
यावेळी रेस्क्यू टीमसह गुरुनाथ कांबळे, उपसरपंच मुस्ताक वडगावे व येथील युवकांनी परिश्रम घेतले. हा बैल किरकोळ जखमी झाला आहे. एका मुक्या जिवाला वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम व गगनबावडा येथील युवकांनी केलेली धडपड त्या बैलाला जीवदान देणारी ठरली.
१२ गगनबावडा बैल
फोटो - गगनबावडा येथे विहिरीत पडलेला बैल.