कोल्हापूर : काॅम्रेड पानसरे यांच्या खुन्यांचा तपास लागत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार शनिवारी सकाळी झालेल्या निर्भय माॅर्निंग वाॅकमध्ये करण्यात आला. या माॅर्निंग वाॅकचे शहीद काॅम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
शहीद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रथम घराबाहेर ठेवण्यात आलेल्या काॅम्रेड पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तोरणानगरातील त्यांच्या घरापासून त्यांच्यावर गोळीबार झालेल्या ठिकाणापर्यंत वाॅक करण्यात आला. ‘काॅम्रेड पानसरे को लाल सलाम’, ‘गोविंद पानसरे अमर रहे’, ‘काॅम्रेड पानसरे का अधुरा काम कौन करेगा, हम करेंगे हम करेंगे’, ‘आम्ही सारे पानसरे’, अशा घोषणा देत हा माॅर्निंग वाॅक झाला. यावेळी सर्वांनी जोपर्यंत काॅम्रेड पानसरे, डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास करून त्यांना शासन होत नाही. तोपर्यंत शासनाला आठवण करून देण्यासाठी या वाॅकचे आयोजन केले जाणार आहे. जोपर्यंत खुन्यांचा तपास लागत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवू या, असा निर्धार उपस्थितांनी केला. यावेळी उमा पानसरे, स्नुषा मेघा पानसरे, प्राचार्य टी.एस. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, आनंदराव परुळेकर, दिलीप पवार, प्रा. उदय नारकर, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे, दिलदार मुजावर, बी.एल. बर्गे, आशा बर्गे, बळवंत पोवार, भगवान यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
(फोटो पाठवत आहे)