कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाच्या सवलत योजनेसंदर्भातील निवेदन निवेदन स्वीकारण्यास कोणी अधिकारी नसल्यामुळे संतप्त झालेल्या कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदरचे निवेदन प्रशिक्षणार्थी उपायुक्त निखिल मोरे यांच्या कार्यालयात खुर्चीला चिकटविले. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.महापालिका प्रशासनाने घरफाळा सवलत योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये ३१ जानेवारीअखेर थकबाकीसह घरफाळा रक्कम भरली तर दंडव्याजात सत्तर टक्के सवलत देण्यात येणार आहे; परंतु थकबाकी भरण्यास नागरिक गेले असता नागरी सुविधा केंद्रांत सवलत योजनेचा आदेश मिळालेला नाही, संगणकात अपडेट झालेले नाही, असे सांगून अधिकारी, कर्मचारी नागरिकांना परत पाठवत आहेत. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी कृती समितीचे सदस्य बुधवारी महापालिकेत प्रशिक्षणार्थी उपायुक्त निखिल मोरे यांना भेटायला गेले होते.परंतु मोरे निवडणूक कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे कृती समितीच्या कार्यकर्त्यांने ते भेटू शकले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी त्यांच्या कार्यालयात खुुर्चीला निवेदन चिकटवले तसेच घोषणाही दिल्या. अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, अंजूम देसाई, श्रीकांत भोसले, महेश लोखंडे, रामभाऊ काळेकर, गोरख कुंभार, परवेझ सय्यद यांनी या आंदोलनात भाग घेतला.कृती समितीचे कार्यकर्ते जेंव्हा महापालिकेत गेले तेव्हा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, घरफाळा विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त विनायक औंधकर त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते; पण कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले नाहीत. ज्यांच्याकडे कार्यभार आहे त्यांना न भेटताच निखिल मोरे यांनाच भेटण्याच्या आग्रह धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा होती.
निवेदन स्वीकारले नाही म्हणून खुर्चीला चिकटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 3:20 PM
Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाच्या सवलत योजनेसंदर्भातील निवेदन निवेदन स्वीकारण्यास कोणी अधिकारी नसल्यामुळे संतप्त झालेल्या कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदरचे निवेदन प्रशिक्षणार्थी उपायुक्त निखिल मोरे यांच्या कार्यालयात खुर्चीला चिकटविले. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
ठळक मुद्देनिवेदन स्वीकारले नाही म्हणून खुर्चीला चिकटवलेघरफाळा विभागाच्या प्रमुखाला भेटण्याऐवजी प्रशिक्षणार्थी उपायुक्तांना भेटण्याचा आग्रह