चंदगड (कोल्हापूर) : शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचा आणि या प्रकरणाची चौकशी करुन तिचा अहवाल पाठविण्याचा आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याना दिला आहे. अश्विनी देवणे असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीमध्ये विजया निवृत्ती चौगुले शिक्षण घेते. शाळेत सांगितलेला शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल तिला तब्बल ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका देवणेयांनी दिली होती.३०० उठाबशा काढल्यानंतर तिच्या उजव्या पायाच्या नसा सुजून रक्तपुरवठा गोठला व ती भोवळ येऊन जाग्यावर कोसळली. त्यामुळे तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्याध्यापिकेची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.
विद्यार्थिनीला उठाबशाची शिक्षा; मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:19 PM
चंदगड (कोल्हापूर) : शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचा
ठळक मुद्देआमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.मुख्याध्यापिकेची चौकशी करून कडक कारवाई करावी