शिरोली : ‘विद्यार्थी हेच शिक्षकांचे खरे धन आहे,’ असे प्रतिपादन शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी केले. ते शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी कृष्णा खोरे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्यावतीने पाटील यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी लाड म्हणाले, पाटील यांनी सेवेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकुलात आणले. अनेक गरीब आणि होतकरू मुलांना चांगले शिक्षण दिले. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. शिरोली हायस्कूलचे नाव पाटील यांनी जगभर पोहोचविले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डी. एस. पाटील यांनी अधिक प्रगल्भ केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पाटील यांनी शिरोली हायस्कूलने खूप काही दिले आहे, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सलीम देसाई, अलाउद्दीन मुल्ला, श्रीकांत पाटील, उत्तम पाटील,जी. पी. चव्हाण, राजाराम पवार, मुख्याध्यापक डी. एम. चौगुले, पर्यवेक्षक बी. जी. माने, शिक्षक रावसाहेब मारापुरे, आर. एस. पाटील, एम. एस. स्वामी, आर. एम. शिंदे, आर. एम. खोत, ए. ए. यादव यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ११ शिरोली हायस्कूल
ओळी
शिरोली हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांचा सेवानिवृत्त सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, शेजारी कृष्णा खवरे, अलाउद्दीन मुल्ला, श्रीकांत पाटील, उत्तम पाटील, जी. पी. चव्हाण, मुख्याध्यापक डी. एम. चौगुले